why chakan burn in maratha andolan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

खेडमधील दोन नेत्यांच्या वादामुळे मराठा आंदोलन चाकणमध्ये पेटले?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 जुलै 2018

पुणे जिल्ह्यातील खेड तालुका हा संवेदनशील तालुका मानला जातो. विमानतळ, सेझ, डाऊ कंपनी, एमआयडीसी अशा  विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी येथे नेहमीच आंदोलने घडली आहेत. यातील काही आंदोलने हिंसकही झाली आहे. मराठा आरक्षणासाठीचे आज पेटलेले आंदोलनही त्याला अपवाद राहिले नाही. मात्र या आंदोलनामागे काही राजकीय गणिते होती का, अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.

पुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी चाकण (ता.खेड) येथे काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. बसेसवर दगडफेक करत २५ ते ३० बसेसची जाळपोळ केल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. जमावकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून यामध्ये ५ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

आंदोलनकर्त्यांनी एसटी बसलादेखील लक्ष्य केले. चाकण येथे एसटी बसची जाळपोळ करण्यात आली. मराठा आरक्षण आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी बसेसची जाळपोळ केल्याने आगीचे लोळ उठले होते. चाकणमध्ये झालेल्या आंदोलनात बसवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही बसचे नुकसान झाले. आंदोलकांच्या हिंसाचारात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते याही या दंगलीत जखमी झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलकांच्या क्षोेभात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बसचे असे अवशेष उरले होते. आंदोलनाला हिंसक वळण लागले असून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता हे आंदोलन भडकविण्यात तर आले नाही ना, अशी शंका आता पोलिस व्यक्त करीत आहे. एका गटाने आंदोलन फार चिघळू नये यासाठी काल जोर लावला होता. तर दुसऱ्या गटाने त्यांचा हा दबाव झुगारण्यासाठी आज सकाळपासून फिल्डिंग लावली. खेड तालु्क्यातील इतर भागात हे आंदोलन शांततेत पार पडले. चाकणमध्ये मात्र त्यास गालबोट लागले. यात एसटी आणि पीएमटी यांचे मोठे नुकसान झाले. पुणे-नाशिक महामार्ग पूर्ण बंद होता. त्यामुळे प्रवाशांचेही मोठे हाल झाले.

संबंधित लेख