६५० कोटी रुपयांचे राफेल विमान १६५० कोटींना का घेतले : पवार यांचा मोदींना सवाल

 ६५० कोटी रुपयांचे राफेल विमान १६५० कोटींना का घेतले : पवार यांचा मोदींना सवाल

बीड : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कथित राफेल गैरव्यवहारावरून भाजप सरकारला आज बीडच्या मेळाव्यात प्रश्न विचारले. पुरावा असल्याशिवाय या गैरव्यवहारात थेट मोदींचे नाव घेणार नाही, असाही खुलासा त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या बीड येथे झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. राफेल करारावरून काॅंग्रेसने भाजपवर टिकेचे प्रहार सुरू केले असताना शरद पवार हे मात्र मोदी यांना सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप केला जात होता. या आरोपाचेही खंडन त्यांनी या सभेत केले.

त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

- राफेल कराराची सर्वपक्षीय चौकशी व्हावी, सरकारने चौकशीला सामारे जावे, खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे. 

- संरक्षणाच्या दृष्टीने तांत्रिक माहिती गुप्त ठेवावी, किंमती सांगायला हरकत काय?

- बोफोर्सच्या चौकशीला राजीव गांधी तयार झाले सामोरे गेले. 

- राफेलमधून देशाची लूट. 

- आपण कोणाचे समर्थन केले नाही, पुरावे नसल्याने वैयक्तीक आरोप करणार नाही, असे म्हणालो होतो. 

- निवडणुकीत देशाची सत्ता मागताना आमचा एक सैनिक मारला तर त्यांचे दहा मारू म्हणत. आता आपले दहा शहीद होताना त्यांचा एक मारला जात आहे. 

- ५६ इंच छातीवाले पाकिस्तानला उत्तर का देत नाहीत?

- मनमोहन सिंह सरकार असताना पाकिस्तानला प्रेमपत्र पाठवू नका म्हणणारे आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरच्या लग्नात जेवण करायला जातात. 

- आपल्याला डिवचणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी नेभळट लोकांच्या हातून सत्ता काढावी लागेल. 

- नेहरु, शास्त्री, नरसिंहराव, राजीव गांधी यांनी एकसंध ठेवलेल्या देशाच्या ऐक्याला सरकार सुरुंग लावत आहे. 

- पंतप्रधान फक्त मनकी बात ऐकवितात. पण, बेरोजगार, गृहीणी, अल्पसंख्यांक, शेतकऱ्यांचे दुखणे ऐकायला त्यांचे कान बहिरे झाले आहेत. 

- मुस्लिमांत गरीबी, शिक्षणाचा अभाव अशा समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी धर्माच्या मुद्द्यात सरकार हस्तक्षेप करत आहे. 

- देशाचा कणा असलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com