Why Abu Azmi wanted to meet Amit Shah | Sarkarnama

अबू आझमींना का हवी होती अमित शहांची भेट?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जून 2017

शुक्रवारी गरवारे क्लब येथे भाजप पदाधिकारी यांची बैठक होती तिथे आझमी आले होते.  त्यानंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास आझमी हे मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह तेथे आले होते. परंतु, त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे समजते.            

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असताना समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेध अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी अमित शाह यांना भेटण्यासाठी का प्रयत्न केले याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.        

शुक्रवारी गरवारे क्लब येथे भाजप पदाधिकारी यांची बैठक होती तिथे आझमी आले होते.  त्यानंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास आझमी हे मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह तेथे आले होते. परंतु, त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे समजते.                                 

सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार अबू आझमी यांचा पुतण्या अस्लम याला दिल्ली पोलिसांनी 40 कोटीच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 6 जून रोजी अटक केली आहे. पुतण्या असला तरी आमच्या भावांच्या कुटुंबाचे व्यवहार वेगळे असल्याने माझा अस्लमशी संबंध नसल्याचा खुलासा अबू आझमी यांनी केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे मुंबईत  आहेत. तसेच आसाम येथील अतिरेकी गटाचा याप्रकरणात अटक केलेल्या आरोपीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अस्लमबरोबर आणखी व्यक्ती पोलिसांच्या निशाण्यावर आहेत.                      

अबू आझमी यांनी 'सपा'च्या माध्यमातून काम करताना मांडलेली विचारधारा तसेच मुस्लिम समाजावर कसा अन्याय होतो आहे हे, दाखवण्याचा  प्रयत्न केला आहे.  त्यामुळे  भाजपाच्या विचारधारेशी विसंगत असलेले अबू आझमी हे सत्ताधारी भाजप पक्षाच्या प्रमुखाला भेटण्याचा प्रयत्न करतात, याचाच अर्थ त्यांचा हात दगडाखाली अडकलेला असावा अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

संबंधित लेख