whose suggestion CM will accept? | Sarkarnama

मुख्यमंत्री कोणाचे ऐकणार? एका मंत्र्यांचे की दोन आमदारांचे?

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 2 मार्च 2018

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या तब्बल पावणेसहा हजार कोटी रुपयांच्या तिजोरीच्या किल्ल्या आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. समितीचा अध्यक्ष निवडताना घराणेशाही की राजकीय आणि भौगोलिक समतोल साधण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हेच घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच सर्व इच्छुकांनी त्यांच्याकडेच साकडे घातले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी कोणाचे नाव सुचवले आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र इच्छुकांच्या समर्थकांनी आपापल्या परीने जोर लावला आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (ता. 3) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, येत्या बुधवारी (ता. 7) अध्यक्षाची निवड होईल

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू आणि ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्यासह आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश, आमदार योगेश टिळेकर यांच्या मातुःश्री रंजना टिळेकर यांची नावे चर्चेत आहेत. तीनही नेत्यांनी आपापल्या परीने मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

त्याचबरोबर मंजुषा नागपुरे, नीलिमा खाडे याही नावांचा विचार होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र, कांबळे आणि मुळीक हे या पदासाठी जोरदार दावा करीत असले तरी, त्यांना संधी मिळाल्यास घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत भाजपला पाय आणखी घट्ट करायचे आहेत, तेथील इच्छुकाला मुख्यमंत्री प्राधान्य देणार का, असाही प्रश्न आहे. हा निकष लावल्यास वडगाव शेरीतील योगेश मुळीक यांचे पारडे जड होऊ शकते. सुनील कांबळे हे पाच वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठत्वाचे कार्ड वापरले आहे. गेल्या वर्षी आपली संधी हुकल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या भागातील सदस्याला आतापर्यंत पद मिळाले नाही, त्या नावांचा विचार होऊ शकतो, असेही पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख