देशमुख गढी राखणार की, बाजोरिया यशस्वी होणार ? मतदान झाले 99.60 टक्के

देशमुख गढी राखणार की, बाजोरिया यशस्वी होणार ? मतदान झाले 99.60 टक्के

परभणी : दोन्ही पक्षाकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता.24) जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत माजी आमदार सुरेश देशमुखांची गढी राखली जाते की विप्लव बाजोरियांचा राजकारणातील प्रवेश यशस्वी होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदारसंघासाठी सोमवारी सात केंद्रावर 99.60 टक्के मतदान झाले. परभणीत 133, सेलू 54, पाथरी 65 आणि गंगाखेड केंद्रावर 70मतदारांनी हक्क बजावल्याने 100 टक्के मतदान झाले. दुसरीकडे हिंगोलीतील वसमत आणि कळमनुरी केंद्रावर अनुक्रमे 51 आणि 19 मतदारांनी हक्क बजावला. परंतु हिंगोली केंद्रावर दोन मतदार गैरहजर राहिले. सोमवारी कॉंग्रेसचे सुरेश देशमुख, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया आणि अपक्ष सुरेश नागरे यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. 

गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. या मतदार संघात कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी व शिवसेना भाजपची युती झाली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे इच्छुक उमेदवार आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाच नाही. तर भाजपने आपला उमेदवारच दिला नाही. त्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेले सुरेश नागरे यांचा अर्ज रिंगणातच राहिला. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होणार असल्याचे दिसत होते. परंतू सुरेश नागरे यांनी काही दिवसातच शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा जाहिर केला. त्यामुळे सुरेश देशमुख व विप्लव बाजोरिया यांच्यातच सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

शिवसेनेने विप्लव बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. तर दुसरी कडे कॉग्रेसमधीलच एक गट सुरेश देशमुख यांच्यावर नाराज असल्याचेही बोलले जात होते. अशा परिस्थितीत ही निवडणुक पार पडली आहे. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com