रांजणगाव गणपती कोणाला पावणार? श्रीमंत पंचायतीची लक्षवेधी निवडणूक

रांजणगाव गणपती कोणाला पावणार? श्रीमंत पंचायतीची लक्षवेधी निवडणूक

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती(ता.शिरूर)येथील ग्रांमपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक येत्या बुधवारी(ता.२६)होत असून तालुक्याचे लक्ष लागलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी महागणपती ग्रामविकास पॅनेल आणि विरोधी श्री मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनेलमध्ये सरळ व चुरशीची लढत होत आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी महागणपती पॅनेलकडून दत्तात्रेय पाचुंदकर आणि विरोधी मंगलमूर्ती पॅनेलकडून सर्जेराव खेडकर या दोघांमध्ये सरपंचपदासाठी चुरशीची निवडणुक होत आहे.तसेच एकूण साहा प्रभागातून ग्रांमपंचायतीच्या १७ जागांसाठीही दोन्ही पॅनेलमध्ये निवडणूक होत आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून रांजणगावचा गेल्या १० वर्षात सर्वांगीण विकास केल्यामुळे जनता पुन्हा आमच्या हातात ग्रांमपंचायतीची सुत्रे देणार असल्याचा कणखर दावा सत्ताधारी महागणपती पॅनेलचे प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर,जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर आदींनी केला आहे.

सत्ताधारय़ांवर टिका करणारे विरोधी मंगलमूर्ती पॅनेलचे प्रमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाचुंदकर,माजी सरपंच भिमाजीराव खेडकर,माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर आदींनी आमच्या पॅनेलचा विजय होईल असा दावा केला आहे.

अष्टविनायक महागणपतीचे तिर्थक्षेत्र व पंचतारांकित एमआयडीसी असलेल्या या रांजणगावच्या ग्रांमपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून दोन्ही पॅनेलकडून मतदारांच्या घराघरात जावून गाठीभेटी घेवून प्रचार यंत्रणा राबविली आहे.तसेच पदयात्रा,गाठीभेटी,घोंगडी बैठका,सोशल मीडिया,पोष्टर,बॅनर्स आदींच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होणार असून मताचे मूल्य मोठ्या किमतीने मोजले जाणार असल्याची चर्चा असून या श्रीमंत ग्रामपंचायतीची चावी सत्ताधारयांकडे राहणार की विरोधकांकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,रांजणगाव गणपती या ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक प्रभागात मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.तहसीलदार रणजित भोसले,रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीची पूर्ण तयारी झाली आहे.गुरूवारी मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com