who will form govt in MP | Sarkarnama

मध्य प्रदेशमध्ये कोण सत्तेवर येणार ? सांगता येत नाही.....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

भोपाळ : मध्य प्रदेश या राज्यात काॅंग्रेस आणि भाजपमध्ये काॅंटे की टक्कर सुरू आहे. 230 एकूण जागांपेकी 214 जागांचे कौल हाती अाले असून भाजप 110 आणि काॅंग्रेस 106 जागांवर पु़ढे आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काॅंग्रेसने आघाडी घेतली असली तरी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपली ताकद कायम राखल्याचे दिसून येत आहे. त्यांनी हे राज्य काॅंग्रेसला सहजासहजी मिळणार नाही, याची दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे. येथे काॅंग्रेसला विजयाची अपेक्षा असली तरी सुरवातीच्या अंदाजात दोन्ही पक्ष बरोबरीने चालले आहेत. 

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत. 

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप-कॉंग्रेस यांच्यात काट्याची लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार निकालात पाहायला मिळत आहे. 

चाचण्यांचे कल असे : 
मध्य प्रदेश (जागा : 230 बहुमतासाठी : 116) 
भाजप कॉंग्रेस बसप अन्य 
रिपब्लिक टीव्ही-जन की बात 108-128 95-115 0 7 
टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 126 89 6 9 
इंडिया न्यूज एमपी-नेता 106 112 0 12 
इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 102-120 104-122 1-3 3-8

संबंधित लेख