who will contest from bjp in pune if alliance break? | Sarkarnama

शिवसेना स्वबळावर लढणार मग पुण्यात भाजपचे कमळ कोण फुलवणार?

उमेश घोंगडे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या युतीबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. ही युती तुटलीच तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. भाजपचा उमेदवार त्यानुसार बदलेल का, अशीही चर्चा त्यामुळे सुरू झाली. 

पुणे : शिवसेनेचे नेते भाजपवर हल्ला बोल करत असल्याने दोन्ही पक्षांतील युतीला धोका निर्माण जाला आहे. हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर पुण्यात काय चित्र राहीलल, याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढणार हे आता निश्चित झाले आहे. या परिस्थितीत भाजपा स्वतंत्र लढल्यास पुण्यात भाजपाची वाट बिकट होणार हे निश्‍चित आहे. ही बिकट वाट सुकर करण्यास पक्षाला विद्यमान खासदार अनिल शिरोळे योग्य ठरतील की खासदारपदासाठी इच्छुक असलेले पालकमंत्री गिरीश बापट अधिक सोयीचे होतील याचाही अंदाज बांधला जाऊ लागला आहे. या दोघांशिवाय संजय काकडेदेखील पक्षाकडून इच्छुक आहेत. या दोघांपेक्षा आपणच सक्षम पर्याय असल्याचे सांगणाऱ्या काकडेंना पक्ष महत्व देणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

खासदार शिरोळे यांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे असलेली चांगली प्रतिमा पुन्हा उमेदवारीसाठी जमेची बाजू आहे. दुसरीकडे पालकमंत्री बापट यांची पक्षाच्या संघटनेवर असलेली पकड व पालकमंत्री म्हणून गेल्या चार वर्षात केलेली कामे यामुळे खासदार होण्यास पक्ष त्यांना संधी देणार का हा प्रश्‍न आहे. इतर पक्षीयांमध्ये असलेले सलोख्याचे संबंध ही बापट यांनी जमेची बाजू आहे.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कॉंग्रेस-राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक पाहता पुण्यात मनसेचा उमेदवार राहणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुण्यात मनसेचे महत्व यासाठी आहे की राज ठाकरे यांना मानणारा जवळपास एक लाख मतदार आहे. हा मतदासर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने गेल्यास भाजपाची अडचण वाढल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भाजपासोबत कायम युती राहिली आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेचा हक्काचा मतदार किती याचा नेमका अंदाज येत नाही. मात्र गेल्या काही विधानसभा व महापालिका निवडणुकीत त्यांना झालेल्या मतदानाचा अंदाज घेतला तर शिवसेनेचेदेखील सुमारे लाखभर मतदार पुण्यात आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कॉंग्रेस-राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक पाहता पुण्यात मनसेचा उमेदवार राहणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुण्यात मनसेचे महत्व यासाठी आहे की राज ठाकरे यांना मानणारा जवळपास एक लाख मतदार आहे. हा मतदासर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने गेल्यास भाजपाची अडचण वाढल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भाजपासोबत कायम युती राहिली आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेचा मतदार किती याचा नेमका अंदाज येत नाही. मात्र गेल्या काही विधानसभा व महापालिका निवडणुकीत त्यांना झालेल्या मतदानाचा अंदाज घेतला तर शिवसेनेचेदेखील सुमारे लाखभर मतदार पुण्यात आहेत.

पुण्यात कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. विद्यमान खासदार शिरोळे,  अण्णा जोशी आणि प्रदीप रावत असे भाजपचे तीन खासदार आतापर्यंत झाले. अण्णा जोशी यांनादेखील त्यावेळच्या कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा फायदा मिळाला होता. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाट होती. त्यामुळे खासदार अनिल शिरोळे तब्बल सव्वातीन लाख मतांची आघाडी घेत निवडून आले. मात्र या लाटेतदेखील कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत कदम यांना दोन लाख 54 हजार मते मिळाली होती. मनसेच्या दीपक पायगुडे यांना फारसा प्रचार न करतादेखील केवळ राज ठाकरे यांच्या नावावर 93 हजार मते मिळाली होती. आम आदमी पक्षाचे सुभाष वारे यांनी 28 हजार तर बहुजन समाज पक्षाच्या इम्तियाझ पिरजाने यांनी 14 हजार मते मिळवली होती.

एकूण सर्व आकडेवारी आणि पंतप्रधान मोदी यांचा २०१४ इतका करिश्मा न राहिल्याने यावेळची निवडणूक पुण्याततरी भाजपासाठी फारशी सोपी नाही. यामध्ये बहुजन वंचित आघाडीची भूमिका अद्याप ठरायची आहे. कॉंग्रेसबरोबर जाणार की स्वतंत्र लढणार याबाबत आघाडीचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. वंचित आघाडी स्वतंत्रपणे लढली तर भाजपाला काहीसा फायदा होऊ शकतो. मात्र त्यांची कॉंग्रेसबरोबर आघाडी झाली तर भाजपाची वाट आणखी बिकट होणार हे नक्की. मनसेला सोबत घेण्याची राष्ट्रवादीची खेळी कॉंग्रेसने मान्य केली तर भाजपाला अडचणींना सामोरे जावे लागणार हे नक्की.  
 

संबंधित लेख