45 मतदारसंघ सुटले; पण अमरावतीत नवनीत राणा की गवई यावर अडले...

45 मतदारसंघ सुटले; पण अमरावतीत नवनीत राणा की गवई यावर अडले...

अमरावती : कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील जागावाटप आता अखेरच्या टप्प्यात असूनही विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र सुटलेला नाही. या मतदारसंघातून नवनीत राणा की राजेंद्र गवई यावर चर्चा अडलेली आहे.

राज्यातील 45 मतदारसंघाबाबत निर्णय झाल्याचे समजते. परंतु यात अमरावती मतदारसंघाचा निर्णय अद्यापही होऊ शकला नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अद्याप निर्णय न झालेल्या मतदारसंघात अमरावतीचा समावेश असल्याचे समजते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून नवनीत राणा लढण्यास इच्छुक आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र गवई यांच्यासाठी सोडली आहे.

रिपब्लिकन पक्ष नोंदणीकृत नसल्याने गवईंनी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी सूचना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. राजेंद्र गवईंनी मात्र अद्यापही या सूचनेला होकार दिलेला नसल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ठोके वाढलेले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यावर राजेंद्र गवई ठाम राहिल्यास कॉंग्रेसची उमेदवारी नवनीत राणा यांना मिळणार आहे. या वृत्ताला अमरावती जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी `सरकारनामा`शी बोलताना दुजोरा दिला आहे. राजेंद्र गवई यांनी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, यासाठी कॉंग्रेस नेते आग्रही असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com