who is speakin truth : Bapat or shivtare? | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

खरे कोण बोलतय : बापट की शिवतारे?

उमेश घोंगडे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे : पुण्यात पाणीकपात होणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यात जलसंपदा मंत्री विजय शिवतरे यांनी पुण्याकडून मंजूर क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापरले जात असल्याचा ठपका ठेवल्याने पुण्याच्या पाणीपुरवठ्याचे आगामी काळात नक्की धोरण काय, याबाबत गोंधळ सुरू झाला आहे.

पुण्यातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असल्याने आणि यातील पाणी शेतीसाठी देखील वापरायचे असल्याने त्याच्या नियोजनसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या कालवा समितीची बैठकी झाली होती. 

कालवा समितीची बैठक झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी पाणीकपातीचा निर्णय झाल्याची घोषणाही केली होती. त्यावर सारवासारव करत असा काहीच निर्णय झाला नसल्याचे बापट यांनी त्वरेने सांगितले. असे असले तरी़ पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिकेचे अधिकारी या मागे तांत्रिक कारण सांगत असले तरी ही पाणीकपात असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी बोलत आहेत. पालकमंत्री पाणीकपात झाली नाही, असे एकीकडे सांगत असताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची पालिकेचे पंप बंद करण्यापर्यंत मजल गेली होती.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आज शिवतारे यांनी केलेल्या घोषणेमुळे पुणेकरांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी रोज 1350 एमएलडी पाणी घेणे अपेक्षित असताना महापालिकेकडून तब्बल 1650 एमएलडी पाणी घेण्यात येत असल्याचे शिवतरे यांनी आज सांगितले. त्यामुळे  गेल्या आठवड्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत नेमके काय खरले होते हे पालकमंत्री बापट यांनी जाहीर करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार नाही.

संबंधित लेख