who savindha burnt hang culprits | Sarkarnama

संविधान जळणाऱ्यांना लाल किल्यावर फाशी द्या- हर्षवर्धन जाधव 

संजय जाधव 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कन्नड ः संविधान हे भारत देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. तो काही एका जाती धर्माचा नाही, तद्वतच सर्व जाती धर्माचे मर्म त्यात समावलेले आहे. संविधान जळणाऱ्यांना विशेष बाब म्हणून दिल्लीच्या लाल किल्यावर फाशी द्यावी अशी मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी (ता.14) कन्नड येथे पत्रकार परिषदेत केली. 

कन्नड ः संविधान हे भारत देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. तो काही एका जाती धर्माचा नाही, तद्वतच सर्व जाती धर्माचे मर्म त्यात समावलेले आहे. संविधान जळणाऱ्यांना विशेष बाब म्हणून दिल्लीच्या लाल किल्यावर फाशी द्यावी अशी मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी (ता.14) कन्नड येथे पत्रकार परिषदेत केली. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मराठा तरूणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मन परिवर्तन यात्रा काढल्यानंतर आज शहरातील शासकीय विश्रामगृहात हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार म्हणजे देशातील जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे संविधान जाळणाऱ्यांना लाला किल्यावर जाहीर फाशी दिली गेली पाहिजे. 

मराठा,मुस्लिम, धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. वास्तविक ते इतर समाजाच्या आरक्षणात वाटा मागत नाहीयेत. तरीही काही समाजकंटक जाती जातीत तेढ निर्माण करण्यासाठी गैरसमज पसरवत आहेत. मी स्वतः आमदार असतांना राजपूत, ठाकर, तिरमली, मेवाती समाजातील मुलांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीचा प्रश्‍न मार्गी लावला. 

आमदार हा मतदार संघातील प्रथम नागरिक असतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अठरापगड जातींना बरोबर घेऊन मी काम करत आहे. त्यामुळे कन्नड सोयगाव मतदार संघातील मराठा समाजसह सर्व जाती धर्मातील जनतेने,जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या व विष पेरणाऱ्या विचारांना खत पाणी घालू नये असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केले. 

महात्मा ज्योतिबा फुले व कृषिक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी माझ्यासह मराठा समाजाची भूमिका आहे. राज्य शासनाने महात्मा फुले यांचा भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. वसंतराव नाईक यांच्या संदर्भातही प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवावा त्यास आमचा पाठिंबा राहिल असेही जाधव यांनी स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख