who gives right to satej patil ? : Mahadik | Sarkarnama

मला बावडा बंद करण्याचा अधिकार सतेज पाटलांना कोणी दिला : महाडिक

सदानंद पाटील
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : मला बावडा बंद करण्याचा अधिकार त्याला कुणी दिला? लढायचे असेल तर माझ्याशी लढ! कार्यकर्त्यांना मध्यस्थी घालू नको. अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना खुले आव्हान दिले. 

शिवाजी चौकातील महागणपती भाविकांच्या दर्सनासाठी आज खुला झाला. उदघाटनप्रसंगी महाडिक बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते. 

महाडिक म्हणाले, शिवाजी चौक तरूण मंडळ शक्तीमान मंडळ आहे. महाडिक कुटुंबियास या महागणपतीचा नेहमीच आशिर्वाद लाभला आहे. महाडिकांना जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाने मोठे केले. त्यांच्या आशिर्वादामुळे महाडिक शक्तीशाली बनला आहे. गेली 25 ते 30 वर्षे मी जिल्ह्यावर राज्य करत आहे. असे असताना, मला बावडा बंद करण्याचा अधिकार त्याला कुणी दिला? 

ते म्हणाले, बावड्यातील नव्वद टक्के लोक माझ्यावर प्रेम करतात? या प्रेमाच्या जोरावरच आपण लोकसभा निवडणुकीत बावड्यातून धनंजय महाडिक यांना पन्नास टक्के मतदान घेऊन दाखवणार आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू लागला आहे. धनंजय महाडिक नावाचा अश्‍वमेघ या निवडणुकीत सोडणार आहे. हिंमत असेल तर त्याची लगाम खेचून दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख