who is fooling punekars? | Sarkarnama

पुणेकरांना कोण उल्लू बनवतयं : भाजप की राष्ट्रवादी?

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 13 मार्च 2018

पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभाऱ्यांना सत्ता स्थापून नुकतेच वर्षे पूर्ण झाले. या पार्श्‍वभूमीवर शहरातील विकासकामे, त्यांची सद्यस्थिती, आणि पुढील वाटचाल यावर "सरकारनामा फेसबुक लाइव्ह'वर सविस्तर चर्चा झाली. सभागृह नेते श्रीनाथ भीमाले आणि विरोधी नते चेतन तुपे यांनी आपल्या भूमिका आक्रमकपणे मांडल्या. फेसबुकवरही ही चर्चा मोठ्या संख्याने पाहण्यात आली. पुणेकरांनी यावर अनेक प्रश्न विचारले.

पुणे : पुणेकरांनी वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षाकडे महापालिकेतील सत्तेची सूत्रे दिली पण; या काळात भाजप नेत्यांनी पुणेकरांना "उल्लू" बनविल्याचा घाणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे भाजपच्या कारभाऱ्यांवर यांनी केला. तर; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभाराला पुणेकर विटल्यानेच त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले असून, "खोटे बोल पण रेटून बोल' ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची नीती आहे, अशा शब्दांत महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भीमाले यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. सत्ताधारी आणि विरोधकांनी समोरासमोर येऊन आपापल्या कामगिरीचे दावे मांडले. 

महापालिकेतील नव्या कारभाऱ्यांना सत्ता स्थापून नुकतेच वर्षे पूर्ण झाले. या पार्श्‍वभूमीवर शहरातील विकासकामे, त्यांची सद्यस्थिती, आणि पुढील वाटचाल यावर "सरकारनामा फेसबुक लाइव्ह' च्या सविस्तर चर्चा झाली. तेव्हा भीमाले आणि तुपे यांनी आपल्या भूमिका आक्रमकपणे मांडल्या. 

"सत्ता कशी चालवायची याचे शहणपण भाजपकडे नसल्याने पहिल्याच वर्षी त्यांची कामगिरी खराब असल्याकडे तुपे यांनी लक्ष वेधले. "राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महत्त्वाचे प्रकल्प रखडून ठेवले होते. ते सत्ता येताच मार्गी लावल्याचे सांगत, भीमाले यांनी विरोधी पक्षाचे आरोप खोडून काढले. विकासकामांचे श्रेय आणि त्यावरून झालेले जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत राजकीय कलगीतुरा रंगला. 

भीमाले म्हणाले, ""एवढी वर्षे पुणेकरांनी सत्ता दिली असतानाही राष्ट्रवादीला विकास करता आला नाही. त्यातून सत्ताधाऱ्यांबद्दल गळा काढण्याचे काम पुणेकरांनी त्यांना दिले आहे. विकासकामात खोडा घालण्याचा उद्योग ही मंडळी करीत आहेत. आमच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करणारे धुतल्या तांदळासारखे नाहीत. नागरिकांचे जीवमान उंचविण्याच्या उद्देशाने आम्ही योजना आखल्या, त्यांची कामे सुरू झाली. पण, राजकीय द्वेष म्हणून केवळ विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी घेत आहे. हे कळण्याइतपत पुणे सुज्ञ आहेत. राष्ट्रवादीच्या तुलनेत गेल्या वर्षेभरातील कामगिरी उजवी आहे.'' 

 

तुपे म्हणाले, ""योजनांच्या निविदांचे आकडे फुवण्याचा सपाटा सत्ताधाऱ्यांनी लावला आहे. ते उघड केल्याने पुणेकरांचे हजारो कोटी रुपये वाचविण्याचे काम आम्ही केले. प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत आहे. तरीही पक्षाच्या पातळीवर त्यांची दखत घेतली जात नाही. त्यामुळे पुणेकरांचा पैसा लाटला जातो आहे. एम्प्रेस गार्डनमध्ये घरे उभारण्याचा डाव रचला आहे. त्याविरोधात पुणेकर एकवटले तरी, भाजपचा एकाही नेता पुणेकरांच्या भावना समजून घेण्यासाठी पुढे आला नाही. विकास आराखड्यातही गोंधळ केला आहे. या वर्षेभरात भाजपने केवळ गप्पा मारल्यान कामे मात्र काहीच केली नाहीत.'' 

दिशा माने प्रकरणावरून हमरीतुमरी 

भाजपचे नगरसेवक हे टेंडरमध्ये अडकत असल्याच्या आरोपावरून भीमाले व तुपे यांच्यात भरपूर वाद झाला. अशी काही उदाहरणे असतील तर त्यांचा राजीनामा घेऊ, असे प्रत्युत्तर भीमाले यांनी दिले. त्यावर तुपे यांनी भाजपच्या नगरसेविका दीपा माने यांच्या पतीच्या कारनाम्यांचा उल्लेख केला. यावरून हे आरोप बिनबुडाचे सांगत तुमचे नगरसेवक काय करतात, हे पण मी कागदपत्रांनिशी मांडतो, असा इशारा भीमाले यांनी तुपेंना दिला.  

 
 

संबंधित लेख