who is behind stone pelting in baramati? | Sarkarnama

बारामतीतील दगडफेकीमागे नक्की कोण?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 जुलै 2018

बारामती : बारामती शहरात कोणतीही आंदोलने झाली तरी कधीच हिंसक होत नाहीत. त्यामुळे बारामती शहरात झालेली दगडफेक ही मोर्चाला गालबोट लावण्यासाठी केलेली होती. त्यामागे शिवप्रतिष्ठान या संभाजी भिडेंच्या संघटनेतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केली.

दरम्यान, मराठा मोर्चाच्या वतीने ऍड. विजय तावरे यांनी ही दगडफेक अनुचित होती, त्यामागील सत्य पोलिसांनी शोधून काढावे, अशी मागणी केली. 

मंगळवारी सकाळी प्रशासकीय भवन व बस स्थानकासमोरील दगडफेकीच्या घटनेनंतर दुपारी आंबेडकरवादी संघटनांचे कार्यकर्ते व मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित विविध संघटनांचे कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यात एकत्र आले. त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

मराठा आरक्षण समितीच्या वतीने ऍड. विजय तावरे, नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल काटे यांनी आजचा मोर्चा हा कोणाविरुद्ध नव्हता, तर प्रशासनाविरोधात होता. मात्र, दगडफेकीने या मोर्चाला गालबोट लागल्याचे मत व्यक्त केले, तर काळूराम चौधरी यांनी आम्ही याआधीही मराठा, धनगर, जाट, पटेलांच्या आरक्षणाच्या समर्थनात होतो. आतापर्यंत केवळ पाठिंबा होता. आता उद्यापासून आम्ही मराठा आरक्षण मोर्चात सक्रिय सहभागी होणार आहोत. यापुढे ही आरक्षणाची लढाई केवळ मराठा समाजाची नाही, तर बहुजनांची आहे असेच दाखवू असे सांगितले. 

काळूराम चौधरी यांनी शिवप्रतिष्ठानच्या संघटनेचे कार्यकर्ते गळ्यात मफलर लावून आले होते व आम्ही त्यांना पकडले असल्याचे सांगत जय श्रीराम लिहिलेली भगवी पट्टी त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्याकडे केली. मुनीर तांबोळी यांनीही या मोर्चाला गालबोट लावणाऱ्या तिसऱ्या प्रवृत्तीविरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी केली. 

पत्रकार परिषदेनंतर सर्व नेत्यांनी एकत्र येत मानवी साखळी करून एकात्मतेचा संदेशही दिला. डॉ. पखाले यांनीही एकात्मतेच्या भूमिकेचे स्वागत केले. या प्रकरणातील खऱ्या आरोपींवर योग्य ती कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख