When Rahul Gandhi asks Manmohan singh to cut the cake | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

जेव्हा राहुल गांधी मनमोहन सिंग यांना केक कापायला लावतात...

सरकारनामा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : ' द ऍक्‍सिडेंटल प्राय मिनिस्टर' या चित्रपटात राहुल गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यामध्ये मतभेद असल्याचे दाखविण्यात आले आहे, हे ट्रेलरमधून उघड झाले आहे. मात्र या चित्रपटामुळे कॉंग्रेसविषयी होणाऱ्या अपप्रचाराला ब्रेक लावण्याचे प्रयत्न राहुल गांधी यांनी सुरू केले आहेत.

कॉंग्रेस पक्षाच्या 134 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आगळेवेगळे चित्र पाहावयास मिळाले.

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आग्रहपूर्वक पुढे बोलवून घेतले आणि या निमित्ताने आणलेला खास केक त्यांना कापण्याची विनंती केली.

थोड्या आग्रहानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींसोबत केक कापला. चॉकलेटी रंगाच्या केकचे तुकडे स्वतःच्या हाताने कापून राहुल गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल आदींना त्यांच्या प्लेटमध्ये वाढले.

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी हुकलेले लोकप्रिय युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या सोबत हजर होते. या वेळी कॉंग्रेसनेत्यांची पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेणारी भाषणे झाली.

संबंधित लेख