when mrs fadnavis reveals secret of CM`s health | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

जेव्हा `गृहमंत्री'च सांगतात "सीएम'च्या तब्येतीचे रहस्य! 

सुशांत सांगवे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पुणे : ""मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय कार्यकर्ते कमी आणि सामाजिक कार्यकर्ते जास्त आहेत. लोकसेवा करताना आपण तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे देवेंद्रजी मंत्रोच्चार, ध्यानधारणा करतात. यासाठी त्यांना दैनंदिन कामकाजामुळे वेगळा वेळ मिळत नाही. म्हणून आहे त्या वेळातच ते हे सर्व करतात. त्यांचा आहारही समतोल असतो. म्हणून ते तंदुरुस्त आहेत...,'' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या "गृहमंत्री' अमृता फडणवीस यांनी त्यांच्या तब्येतीचे रहस्य उलगडले.

प्रत्येक तरुणाने तंदुरुस्त राहायला हवे. आपण तंदुरुस्त तर देश तंदुरुस्त, असेही त्या म्हणाल्या. 

कॉंटिनेंटल प्रकाशनाच्या समारंभात अध्यात्मावर आधारित अभिनेत्री स्मिता जयकर लिखित "आता नाही तर केव्हा...?' या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे रहस्य सांगितले.
पुस्तकाच्या अनुवादक आणि निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, प्रकाशिका अमृता कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाल्या, ""स्वतःला ओळखायचे असेल तर अध्यात्माकडे वळणे गरजेचे आहे; पण अनेकजण  उतारवयात अध्यात्माकडे वळतात. हे चुकीचे आहे. उतारवयापेक्षा लहानपणापासून किंवा तरुणपणापासूनच आपण अध्यात्माकडे वळायला हवे. देव आपल्यासोबत असतो. तो आपल्यातच असतो. हे ओळखण्यासाठी एक शक्ती, विश्वास लागतो. तो आपल्याला यातून मिळतो. शिवाय, आपण मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतो. अध्यात्म आत्मसात करण्यासाठी या काळात कोणाला हिमालयात जाण्याची गरज नाही. आहे तिथे राहून आपण हे ज्ञान ग्रहण करू शकतो. समाजातील भोंदू बाबांवर, अंधश्रद्धांवर विश्‍वास ठेवू नये. काय चांगले, काय वाईट कळायला हवे. त्यासाठी आपण सतत सजग राहायला हवे.''

संबंधित लेख