When I was on hunger strike in Baramati, Supriya sule had visited me : Raju shetty | Sarkarnama

मी बारामतीत उपोषणाला बसलो तर सुप्रिया सुळे माझी विचारपूस करायला आल्या होत्या : राजू शेट्टी 

सरकारनामा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

थेट विरोधक असतानाही सुप्रिया सुळे माझ्या प्रकृतीची  विचारपूस करायला आल्या होत्या . याला म्हणतात लोकशाही .

- राजू शेट्टी

पुणे : "मी भाजप बरोबर असताना पवारांच्या गावात बारामतीमध्ये उपोषणाला बसलो होतो . थेट विरोधक असतानाही सुप्रिया सुळे माझ्या प्रकृतीची  विचारपूस करायला आल्या होत्या . याला म्हणतात लोकशाही . आज देशात आणीबाणी आहे . मला गुजरातमध्या आंदोलनासाठी जायचे होते तर मला गुजरातमध्ये येऊच दिले नाही," असे राजू शेट्टी  येथे म्हणाले . 

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले,"आज शेतकरी संपूर्णपणे अडचणीत आलेला आहे. गोहत्याबंदी सारखे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या गायींचे करायचे काय ? नको असलेल्या गायी विकायच्या तर आधी गोरक्षकांचे हात ओले करावे लागतात . सरकार या गायी सांभाळीत नाही आणि विकूही देत नाही . "

भाजप बरोबर गेलो ही आपली चूक झाली हे मेनी करीत राजू शेट्टी पुढे म्हणाले ," तरी मला कुमार सप्तर्षींनी हिंट  दिली होती की जाऊ नकोस . पण तेंव्हा राजीव सातव यांच्यासारखे लोक सत्तेत होते , ते आमची कामे करायचे नाहीत . म्हणून मला तेंव्हा भाजप बरोबर जावे लागले . "

संबंधित लेख