when collector request bapat for running | Sarkarnama

आयुक्त आणि जिल्हाधिकारी बापटांना धावण्याची विनंती करतात तेव्हा..!

ज्ञानेश सावंत
रविवार, 9 डिसेंबर 2018

पुणे : "सकाळ माध्यम समूह' पुरस्कृत बजाज अलियांस पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये आज पुणेकरांनी उत्साहात सहभाग घेतला. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत सर्वजण मनोसक्त धावले. पुण्यातील राजकीय नेते, अधिकारी यांनीही धावण्याचा आनंद लुटला.

पुणे : "सकाळ माध्यम समूह' पुरस्कृत बजाज अलियांस पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये आज पुणेकरांनी उत्साहात सहभाग घेतला. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत सर्वजण मनोसक्त धावले. पुण्यातील राजकीय नेते, अधिकारी यांनीही धावण्याचा आनंद लुटला.

पुणेकरांच्या गर्दीने फुललेल्या मॅरेथॉन मार्गावर हजारो स्पर्धक उतरले असतानाच पुण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम हेही तयारीनिशी मार्गावर आले. तेव्हा, आपल्यासोबत धावण्याचा आग्रह जिल्हधिकारी राम यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना केला; पण "मी पहिल्या फेरीत 21 किलोमीटर धावून आलो आहे आणि सहा किलोमीटर तुमच्यासाठी ठेवल्याचे सांगून बापटांनीही आयुक्त राव आणि जिल्हाधिकारी राम यांना पळण्याचा सल्ला दिला. तेवढेच नाही तर "वेळेत धावा' असा चिमटाही बापटांनी काढला आणि मॅरेथॉन मार्गावरील गर्दीत हास्याची कारंजी उडाली.

पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राव आणि राम यांनी सहा किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबतीला खासदार अनिल शिरोळे आणि महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक हेही होते. 

आयुक्त राव, जिल्हाधिकारी राम धावले, ते "सकाळ माध्यम समूह' पुरस्कृत बजाज अलियांस पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये! बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून पुणेकरांच्या प्रचंड प्रतिसादात मॅरेथॉनला प्रारंभ झाला. पालकमंत्री बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, पोलिस आयुक्त के. वेंकटशम यांनी स्पर्धकांना निशाण दाखविले आणि जल्लोषात मॅरेथॉन पुढे सरकली.

वेगवेगळ्या तीन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत, सामान्य नागरिकांसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. स्पर्धेकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संकुलात केलेल्या नेटक्‍या नियोजनामुळे मॅरेथॉन पुणेकरांसाठी शानदार "इव्हेंट' ठरला. 

महापालिकेच्या विविध खातील अधिकारीही मोठ्या संख्येने मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यांचे नेतृत्व राव यांनी केली. तेव्हा राव यांनी राम यांना सोबत घेतले. पण "बापट साहेब आपणही या ना' असा आग्रह राम यांनी बापटांकडे धरला. त्यावर आपल्या शैलीत बापट म्हणाले,"" माझे धावणे झाले आहे. आता तुम्हाला पळायचे आहे. तुम्ही जा.''
 
मॅरेथॉनमध्ये विविध राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी सहभाग नोंदविला. त्यात स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, गोपाळ िंचतल, नरगसेवक, महेश लडकत, दिलीप वेडे-पाटील, हेमंत रासने, किरण दगडे-पाटील, अमोल बालवडकर, स्वप्नाल सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, मंजुश्री खर्डेकर, अजय खेडेकर, आदित्य माळवे, उमेश गायकवाड, दीपक पोटे, बापू मानकर मनिष आनंद, उपायुक्त माधव जगताप हे स्पर्धेत उतरले होते.
 

संबंधित लेख