राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी अमरसिंह पंडितांच्या नावाची घोषणा कधी होणार? 

जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराण्यांमध्ये पंडित हे मोठे नाव आहे. मागच्या ५० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या शिवाजीराव पंडित यांची जिल्हाभर ओळख आहे. अमरसिंह पंडित देखील दोन वेळा विधीमंडळाचे सदस्य राहीले आहेत. अमरसिंग पंडित गेल्या वर्षभरापासून लोकसभेची तयारी करीत आहेत . आता पक्षाकडून अधिकृतपाने त्यांचे नाव कधी जाहीर होते याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे .
Amarsingh pandit.
Amarsingh pandit.

बीड : महिनाभरापूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा खासदार डॉ. प्रितम मुंडेंची उमेदवारी जाहीर केली. विकास कामांच्या निमित्ताने भाजपचा प्रचारही जोरात सुरु आहे. राष्ट्रवादीत मात्र उमेदवाराची चाचपणीच सुरु होती. अखेर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अमरसिंह पंडित यांच्या नावावर जवळपास  शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख राजघरण्यांपैकी पंडित हे प्रमुख घराणे आहे. माजी मंत्री शिवाजीराव पंडित हे ५० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असल्याने जिल्हाभरात त्यांची ओळख आणि कार्यकर्ते आहेत. खुद्द अमरसिंह पंडितही एकदा विधानसभा आणि एकदा विधानपरिषद सदस्य राहील्याने त्यांचाही जिल्हाभर राबता आहे. या जमेच्या बाजूंमुळेच त्यांचे नाव पुढे आल्याचे सांगण्यात येते. पक्षाकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नसली तरी पक्षाकडून उमेदवारीची चर्चा अमरसिंह पंडित यांच्याभोवती येऊन ठेपल्याचे समजते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील उमेदवार होते. त्यांचा भाजपातर्फ़े जयसिंगराव गायकवाड यांनी पराभव केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाडच राष्ट्रवादीत आले आणि त्यांनी तत्कालिन भाजप उमेदवार प्रकाश सोळंके यांचा पराभव केला. आतापर्यंत झालेल्या चार निवडणुकांत राष्ट्रवादीने जिंकलेली ही एकमेव निवडणुक होती. मात्र, वरिल दोघांनीही राष्ट्रवादीतून भाजमध्ये प्रवेश केला.

 २००४ सालच्या निवडणुकीत सुरेश धस विरोधात होते. धसांनाही सव्वा लाखांवर मतांनी पराभव पत्करावा लागला.  त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले. पक्षाची राज्यात आणि जिल्ह्यात सत्ता असताना मुंडेंच्या विरोधात सर्वच मातब्बरांनी एकमेकांकडे बोट दाखवायला केली. यावेळी नवखे असलेले रमेश आडसकर त्यांच्या विरोधात लढले. विशेष म्हणजे त्यावेळी  आडसकरांनी चार लाख मतांचा टप्पा पार करत विक्रम केला होता. तर, मुंडेंनीही सव्वा लाखांवर मतांच्या आघाडीने  निवडणुक जिंकली. विशेष म्हणजे, आता आडसकर आणि धस हे दोघेही भाजपात आहेत. 

एकूणच आतापर्यंत राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुक लढविलेला एकही उमेदवार राष्ट्रवादीत नाही. दरम्यान, मागच्या वेळी पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या डॉ. प्रितम मुंडे यांची उमेदवारी सुरुवातीपासून निश्चित मानली जात होती. महिनाभरापूर्वी खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. विकास कामांच्या उद॒घाटन, भूमिपुजनाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचारही सुरु आहे. 

मात्र, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा तिढा आणि विविध कारणांनी ओबीसींसह दलित समाज भाजपा पासून दुरावल्याचा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. त्यामुळे ही मते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या झोळीत पडतील आणि पक्षाला विजय मिळेल असे गणित मांडले जात आहे. त्यानुषंगाने राष्ट्रवादीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु होती. माजी मंत्री शिवाजीराव पंडित ५० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात आहेत. वयाची ८३ वर्षे पार केलेले शिवाजीराव पंडित आजही शिक्षण, सहकार, शेती व राजकारणाच्या माध्यमातून सक्रीय असतात. त्यांचे कट्टर समर्थक शिवाजीरावांना राजकारणातील भिष्माचार्य म्हणतात. याचा फायदा पुत्र अमरसिंह पंडित यांना होईल असे आडाखे बांधले जात आहेत. 

तर, अमरसिंहांचे बंधू विजयसिंह पंडित यांनी देखील अडीच वर्षे जिल्हा परिषद  अध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांचीही जिल्हाभर ओळख आहे. तर, उमेदवार म्हणून नाव पुढे आलेले अमरसिंह पंडित एक वेळा विधानसभेचे तर एक वेळा परिषदेचे आमदार राहीले आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीत महत्वाच्या पदांवर असल्याने त्यांचाही जिल्हाभर राबता आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे यांच्या विश्वासू गोटातील अमरसिंह पंडितांनी काही वेळा श्री. पवारांसोबत परदेशात शेतीअभ्यास दौरेही केले आहेत. वकृत्वात पारंगत आणि आक्रमक ही देखील त्यांची जमेची बाजू आहे. तसेच, मुंडेंचे कट्टर विरोधक अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जाते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com