WHEARE I WENT BJP DEFEATED : CHANDRSHEKHAR | Sarkarnama

मी जेथे गेलो, तिथे भाजपचा पराभव : चंद्रशेखऱ

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे : भीम आर्मीचे चंद्रशेखर ऊर्फ रावण यांनी आज समता भूमीला भेट दिली. सावित्रीबाई आणि महात्मा फुले हे आमचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत महात्मा फुले हे देशाचे खरे राष्ट्रपिता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

समता भूमी येथे भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आपण कोरेगाव भीमा येथे जाण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. मी जिथे जिथे गेलो तिथे भाजप हरली. आता महाराष्ट्रात पण भाजप हरेल, असा दावा त्यांनी केला. मी अशांतता पसरवत नाही. मात्र सध्याच्या राजवटीत बहुजनांचा, आंबेडकरवाद्यांचा आवाज चेपला जात आहे. मी कार्यकर्ता आहे; नेता नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर हे नेते आहेत. त्यांना कोरेगाव येथे सभा घेऊ दिली जात आहे. मी कार्यकर्ता आहे. मला मात्र सभा घेऊ दिली जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

मी सध्या निवडणुकीचे राजकारण करणार नाही. पण डाॅक्टर आंबेडकर आणि कांशीराम यांचे राजकारण करणार असल्याचेह स्पष्ट केले.

संबंधित लेख