what will speak sharad pawar on bjp-ncp alliance in nagar | Sarkarnama

जगताप पिता-पुत्रांची गद्दारी : शरद पवार रविवार नगरमध्ये काय बोलणार?

मुरलीधऱ कराळे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नगर : महापाैर, उपमहापाैर निवडणुकीत भाजपने दोन्ही पदे मटकावली. राष्ट्रवादीत फोडाफोडी करून नगरसेवकांचे मत मिळविले. या फोडाफोडीत सर्व खापर आमदार जगताप पितापुत्रांवर फोडले गेले. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही आमदार जगताप यांच्यावर रोष व्यक्त करीत पक्षाध्यक्षांकडून कारवाई होईल, असे सांगितले.

त्यामुळे येत्या रविवारी (ता. ३०) शरद पवार नगरला येणार आहेत. राष्ट्रवादीत झालेल्या बेकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीे पक्षाध्यक्ष शरद पवार काय बोलणार, हे आैत्सुक्याचे ठरणार आहे.

रविवारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शरद पवार नगरला येणार आहेत. या वेळी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही होईल. या वेळी ते काय बोलणार, कोणावर कारवाई करणार, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे.

कोणी केली गद्दारी?

महापाैर निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन नंबरची मते मिळाली. राष्ट्रवादी व भाजप यांच्यात युती करून स्थानिक नेत्यांनी सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. वरिष्ठांकडून मात्र याला लाल सिग्नल मिळाला. भाजपशी युती करायची नाही, असे आदेश मिळाले असले तरी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप या पितापुत्रांनी गद्दारी केली, अशी भावना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आमदार संग्राम जगताप यांचे सासरे असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सांगण्यावरून या घडामोडी घडल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर शरद पवार काय निर्णय घेणार, याबाबत चर्चा होत आहे.
 
संबंधित लेख