What will Narayan Rane gain Ministerial birth or Rajyasabha ? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध :  राणेंना  मंत्रिपद देणार की राज्यसभेवर पाठवणार ? 

प्रशांत बारसिंग : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई  :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिल्यानंतर कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनीही दसऱ्याच्या आधी सीमोल्लंघन करणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना पुष्पगुच्छ तर काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्‍यता आहे.

मुंबई  :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिल्यानंतर कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनीही दसऱ्याच्या आधी सीमोल्लंघन करणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना पुष्पगुच्छ तर काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्‍यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले; परंतु त्याची निश्‍चित तारीख आज सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तार करताना मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी केआरए फॉर्म आणि एक प्रश्‍नावलीही तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी त्यांनी अहमदाबाद येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचा व्हिडीओही मध्यंतरी व्हायरल झाला होता. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपच्या केंद्र आणि राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये अनेकदा गुप्त चर्चाही झाल्या होत्या.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते राणे यांना दिल्लीत पाठवण्याच्या मताचे आहेत. राणे यांचा स्वभाव लक्षात घेता ते राज्यातील नेतृत्वाला सहजपणे काम करू देणार नाहीत, असे राज्यातील नेत्यांना वाटते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राणे यांना राज्यसभेवर पाठवायचे म्हटले तर आमदार नितेश राणे यांना राज्यात राज्यमंत्रिपद आणि नीलेश राणे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याची राणे यांची मागणी असल्याचे सांगण्यात येते. राज्यसभा निवडणुका एक वर्षानंतर आहेत; परंतु राणे दिल्लीत जाण्यास फारसे इच्छुक नसल्याचे सांगण्यात येते. 

 राज्यात मंत्रिपद दिले तर ते 2019 मधील निवडणुकीत नितेश यांना आमदारकी आणि नीलेश यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची राणे यांची दुसरी मागणी आहे. त्यांच्या दोन्ही मागण्यांवर भाजपचे वरिष्ठ नेते विचार करत असल्याची चर्चा आहे. 

संबंधित लेख