What Manikrao Kokate Will do if Bjp Allies with Sena | Sarkarnama

शिवसेना- भाजप युतीच्या संकेतांनी भाजप नेते कोकाटेंचा अपेक्षाभंग?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये विधानसभेची निवडणुक स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. सिन्नर मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोकाटे यांचा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला होता. आगामी 2019 मध्ये लोकसभेसाठी स्वतः कोकाटे तर विधानसभेसाठी कन्या सिमांतीनी कोकाटे यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क सुरु केला होता. त्यात मतदारांना त्यांनी आपण लोकसभा निवडणुकीत उमेदवार असणारच, पक्ष कोणताही असू शकतो असे स्पष्टपणे सांगीतले होते.

सिन्नर : शिवसेनेने नाही नाही म्हणता अखेर भारतीय जनता पक्षाशी युतीचे संकेत दिलेच. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी वाट पाहणारे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. लोकसभा तर गेलीच विधानसभेच्या उमेदवारीवर पाणी पडणार आहे. त्यामुळे विविध पक्षांशी घरोबा केलेले कोकाटे आता काय करणार? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. 

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये विधानसभेची निवडणुक स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. सिन्नर मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोकाटे यांचा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला होता. आगामी 2019 मध्ये लोकसभेसाठी स्वतः कोकाटे तर विधानसभेसाठी कन्या सिमांतीनी कोकाटे यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क सुरु केला होता. त्यात मतदारांना त्यांनी आपण लोकसभा निवडणुकीत उमेदवार असणारच, पक्ष कोणताही असू शकतो असे स्पष्टपणे सांगीतले होते.

मात्र, आता शिवसेना भाजप युतीचे संकेत मिळाल्यावर नाशिक लोकसभा आणि सिन्नर विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार अशी चिन्हे आहेत. येथे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार राजाभाऊ वाजे हे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. अशा स्थितीत केवळ उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये थांबलेले कोकाटे यांच्या उमेदवारीवर नैसर्गिक न्यायाने फुली मारली गेली आहे. ते आता काय भूमिका घेतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. 

माजी आमदार कोकाटे यांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्या सिमांतीनी कोकाटे यांना त्यांचे राजकीय वारस म्हणुन गेले वर्षभर प्रोजेक्ट केले जात आहे. विधानसभेच्या भावी उमेदवारी म्हणुन त्यांनी मतदारसंघात संपर्क सुरु केला आहे. सिन्नर तालुक्यात पक्ष नव्हे तर गटांचे राजकारण चालते. सध्या आमदार वाजे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे गट सक्रीय आहेत. गट शाबुट ठेवण्यासाठी त्यांना उमेदवारी करावीच लागेल. फक्त ती स्वतः कोकाटे करणार की कन्या सिमांतीनी उमेदवार असतील याची  अन् भाजप शिवसेनेसोबत गेल्यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी की अपक्ष यावर भविष्यातील घडामोडी ठरणार आहेत. 

संबंधित लेख