WHAT LIES IN PAGADI | Sarkarnama

पवारांनी भुजबळांची पगडी का बदलवली? कायं दडलय पागोट्यात?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 10 जून 2018

पुणे : पुण्यातील दोन प्रकारच्या पगड्या दोन संस्कृती सांगतात. दोन विचारसरणी मांडतात. एखाद्या व्यासपीठावरील वक्त्याला नको ती पगडी चढवली की नको ती समीकरणे सुचतात. त्यातून अर्थही बरेच निघतात. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या अर्थांची सखोल माहिती असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छगन भुजबळ यांना सुरवातीला घालण्यात आलेली पगडी चुकीची होती, हे सांगत महात्मा फुले यांच्या पद्धतीचे पागोटे भुजबळ यांना पुन्हा घालावे लागले.

पुणेरी पगडी म्हणून जी लोकमान्य टिळकांच्या डोक्यावर किंवा तत्कालीन ब्राह्मण नेत्यांच्या डोक्यावर छायाचित्रांतून सदैव दिसते. पुण्यात कोणताही पाहुणा आला की पुण्याचे वैशिष्ट्य म्हणून ही पगडी डोक्यावर चढवून त्याचे स्वागत करण्याची परंपरा आहेच. मात्र या `पुणेरी` पगडीपेक्षा महात्मा फुले परीधान करत असलेले पागोटे हे सर्वसमावेशक आहे, असे सांगत डावे, समाजवादी, ब्राह्मण्यवादाला विरोध करणारी मंडळी या पागोट्याला प्राधान्य देऊ लागली.

छगन भुजबळ यांच्या समता परिषदेतर्फे होणाऱ्या कार्यक्रमात तर हेच पागोटे आवर्जून वापरले जाते. भुजबळ हे तब्बल साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या व्यासपीठावर आज आले होते. ते काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यांचे स्वागत ब्राह्मणी पद्धतीच्या पुणेरी पगडीने करण्यात आले. स्वतः पवार यांनी ही पगडी त्यांना परीधान केली. त्यानंतर भुजबळ यांचे भाषण झाले.

भुजबळ यांच्यानंतर पवार हे भाषणासाठी उभे राहिले. भाषणाची सुरवात त्यांनी पुणेरी पगडीपासून केली. पक्षाच्या पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांचे नाव घेऊन त्यांनी अशी पुणेरी पगडी आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर देणे योग्य नाही, अशा स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. महात्मा फुले यांचे पागोटे हेच यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात वापरले जाईल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच हे पागोटे कसे असते हे सुद्धा त्यांनी तातडीने दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी हे पागोटे पुन्हा भुजबळ यांच्या डोक्यावर चढविण्याची सूचना केली.  ही नवीन पगडी भुजबळांच्या डोक्यावर बसल्यानंतरच पवार यांनी पुढील भाषण सुरू केले.

  वाचा आधीच्या बातम्या : पवार साहेबांना मी कसा सोडेन? : छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा

  लोकांचे माझ्यावरचे प्रेम अटॅच करता आले नाही - छगन भुजबळ

संबंधित लेख