what get maratha`s after agitation : Mane | Sarkarnama

मराठ्यांचे लाखांचे मोर्चे निघाले; पण मिळाले काय : लक्ष्मण माने यांचा सवाल

संपत मोरे
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

पुणे : "आजवर आमच्या चुली पेटल्या नव्हत्या म्हणून आम्ही रोज रस्त्यावर होतो. तेव्हा तुम्ही आमची टिंगल करत होता. आता तुमच्या चुली पेटायच्या बंद झाल्या. मग तुम्ही  रस्त्यावर आला. तुम्ही रस्त्यावर आला म्हणून मुख्यमंत्री तुमच्यासमोर वाकले अस वाटतंय. पण तुम्हाला काय मिळालं, असा सवाल `उपरा`कार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाच्या मोर्च्याबाबत केला. 

पुण्यात वंचित आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. एमआयएमचे आमदार इम्तिआज जलिल या वेळी उपस्थित होते. 

माने म्हणाले,"आमच्या चुली कधीच पेटत नव्हत्या. मग आम्ही रस्त्यावर यायचो. आम्ही रस्त्यावर आलो कि मोर्चे काढतात म्हणून आमची तुम्ही टिंगल करत होता. आमचे मोर्चे १००-२०० चे असायचे. तुमचे लाखाच्या घरात निघतात. तुमच्या मोर्च्याला मुख्यमंत्री फडणवीस घाबरले असं तुम्हाला वाटतंय. पण मोर्चे काढून तुम्हाला काय मिळालं?

ते म्हणाले, "निवडणुकीच्या काळात जर कोणी पाचशे रुपये घेऊन आला तर घेऊ नका. पाच हजार दिले तर घ्या. दहा हजार दिले तरी घ्या. आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका. तो काही कष्टाचा पैसा नाही. हरामाच्या मार्गांनी कमावलेले आहेत  त्यांना नाही म्हणू नका. पैसे घ्या. आपली किमंत वाढवा. पण मते मात्र वंचित आघाडीला द्या."

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. हे पुणे सावित्रीचे माहेरघर आहे. या माहेरघरात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता काम नये. वंचित आघाडीने जे ठराव केले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्यातील पक्षांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.   
 
संबंधित लेख