येवल्यातील शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार रुपचंद भागवतशी छगन भुजबळ काय बोलले?

येवल्यातील शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार रुपचंद भागवतशी छगन भुजबळ काय बोलले?

येवला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सांभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार रुपचंद भागवत यांच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला काल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अर्धा तास बंद दाराआड त्यांच्याशी चर्चाही केली. त्यामुळे येवल्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. भुजबळ- भागवत यांच्यात काय चर्चा झाली हे जाहीर झाले नाही. मात्र, त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढली.

येवला  : येवला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सांभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार रुपचंद भागवत यांच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला काल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अर्धा तास बंद दाराआड त्यांच्याशी चर्चाही केली. त्यामुळे येवल्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. भुजबळ- भागवत यांच्यात काय चर्चा झाली हे जाहीर झाले नाही. मात्र, त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढली.

येथील स्थानिक नेत्यांशिवाय निवडणूक निवडणूक लढवणे सोपे नाही. या नेत्यांना जवळ करणे देखील फारसे कठीण नाही हे भुजबळांनी यापूर्वी करुन दाखविले आहे. मात्र, आता तर भुजबळांनी विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मागत असलेले रुपचंद भागवत व त्यांचे बंधू विष्णू भागवत यांची सांत्वनाच्या निमित्ताने भेट घेऊन बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. यामुळे तालुक्‍यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भुजबळांनी घेतलेली भेट आगामी निवडणुकीसाठी काय राजकारण घडवून आणते हे आता औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांचे चुलते लक्ष्मण भागवत यांच्या दशक्रिया विधी गवंडगाव येथे होता. छगन भुजबळ त्यांच्या घरी सांत्वनाला गेले. जेष्ठ नेते अंबादास बनकर, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार उपस्थित होते. वर्षभरापासून भागवत बंधूनी मतदारसंघात गावोगावी शिवसेना व नारायनगिरी महाराज फौंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून जनसंपर्क वाढवला आहे

मागील पाच वर्षात मतदारसंघात विकासाला खो बसला असून मतदारांशी भुजबळांचे संबंधही पहिल्यासारखे राहिलेले नाही. त्यामुळे भुजबळ आतापासूनच सावध पवित्रा घेताना दिसत असल्याचे या भेटीतून स्पष्ट होते. शिवसेनेकडून गत निवडणुकीत भुजबळांना जोरदार लढत दिलेले संभाजीराजे पवार उमेदवारीसाठी पुन्हा तयार आहेत. भागवत बंधूंनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.पवार, भागवतांपैकी कोणीही उमेदवार झाला तरी यावेळी निवडणूकीत ताकही फुकून प्यावे लागणार आहे, हेही भुजबळांना माहित आहे.

सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे दोन आमदार असून जिल्हा परिषद,पंचायत समिती,खरेदी विक्री संघ,नगरपालिका या संस्थांवर सेनाप्रणित सत्ता आहे. त्यातच राष्ट्रवादीतही अंतर्गत धुसफूस कमी नाही म्हणून की काय आगामी धोके टाळण्यासाठी भुजबळांनी भागवतांची सहानुभूतीसाठी भेट घेतल्याचा अंदाज आहे. या बैठकीत भुजबळांनी भागवतांना उमेदवारी करणार आहात का असा सवाल केल्याचे कळते. याशिवाय इतर राजकीय व सामाजिक चर्चाही झाली. विरोधी नेत्याची घेतलेली भेटीमुळे भुजबळांची ही गुगली आगामी राजकारणात वेगळा संकेत देणारी तर नाही ना अशीही चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com