western maharshtra leaders wokr for congress | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना काॅंग्रेसने खूप दिले आता त्यांनी पक्षासाठी झटावे : आझाद

ज्ञानेश सावंत
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे : पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्या पक्षाची येथे वाताहात झाली असून, हाताच्या बोटावर आमदार निवडून आलेले आहेत. खासदार तर एकही नाही. या स्थितीची दखल दिल्लीतील काॅंग्रेस नेत्यांनी घेतली असून, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पक्षासाठी काम करण्याचा सल्ला देण्यात आला.

"पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना खूप काही दिले आहे. नेत्यांनी आता पक्ष वाढविण्यासाठी झटावे,' असा सल्ला देत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गटातटाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले. पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा पश्चिम महाराष्ट्रातील समारोप पुण्यात झाला. या वेळी ते बोलत होते.

आझाद यांनी 1979 मध्ये महाराष्ट्रातून पहिली निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांना राज्यातील राजकारण आणि नेत्यांची पद्धत  काही निवडणुकांमध्ये आझाद यांनी विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील सभा घेतल्या आहेत. या साऱ्याचा उल्लेख करून आझाद म्हणाले की मी विठ्ठलराव गाडगीळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात आलो होतो. लोकांचे पक्षावरील प्रेम मला माहीत आहे. सुरेश कलमाडींच्या प्रचारासाठी मी सभा घेतल्या होत्या. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पक्षाने खूप काही दिले आहे. मात्र, त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामुळे विरोधकांना रोखता येईल.''

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून काॅग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा संकल्प आपल्या भाषणात व्यक्त केला. आमदार संग्राम थोपटे यांनी सर्व विरोधकांना नमविणार असल्याचा दिलासा उपस्थितांना दिला.

संबंधित लेख