We will withdraw support of congress governments in MP & Rajasthan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

तर मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेऊ : मायावती

वृत्तसंस्था
सोमवार, 31 डिसेंबर 2018

.

लखनौ : मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येऊन महिना देखील पूर्ण झाला नाही तर मायावतींनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे.

बहुजन समाज पक्षाच्या दोन आमदारांचा कमलनाथ यांच्या सरकारला पाठिंबा असल्याने कॉंग्रेसला बहुमत मिळालेले आहे. मध्यप्रदेशमध्ये बहुमताचा आकडा 115 असून कॉंग्रेसचे 114 आमदार निवडून आलेले आहेत तर भाजपचे 109 आमदार निवडून आलेले आहेत.

मायावती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, " भारत बंदच्या निमित्ताने 2 एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये दलित आणि बसपा कार्यकर्त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले गुन्हे आणि खटले तातडीने मागे घेण्यात यावेत. या दोन्ही राज्यात कॉंग्रेसचे सरकार आहे. या दोन राज्यात हे गुन्हे आणि खटले मागे घेतले नाही तर आम्ही कॉंग्रेसला बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या निर्णयाचा फेरविचार करू.''

संबंधित लेख