We will Teach Boys How to Behave with Girls says Aditya Thakray | Sarkarnama

आदित्य ठाकरे म्हणतात, 'आम्ही मुलांनी मुलींशी कसे वागावे हे शिकवू' 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

गेले दोन दिवस आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत नाशिकला विविध कार्यक्रम झाले. नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांनी आयोजित केलेल्या महिला प्रशिक्षण वर्गाची सुरवात त्यांच्या उपस्थितीत झाली.

नाशिक : ''प्रत्येक बाबतीत मुलींना दोष दिला जातो हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही मुलींना स्वयंपुर्ण, स्वसंरक्षणासाठी तत्पर तयार करण्यावर आम्ही भर देत आहोत. त्याचबरोबर मुलींसमवेत मुलांनी जबाबदारी कसे वागायचे याचेही संस्कार देण्यावर आमचा भर आहे," असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. 

गेले दोन दिवस आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत नाशिकला विविध कार्यक्रम झाले. नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांनी आयोजित केलेल्या महिला प्रशिक्षण वर्गाची सुरवात त्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते म्हणाले, ''महिलांशी संबंधीत गुन्हे वाढत आहेत. बलात्कार, महिलांवरील हल्ले, विनयभंग यांसारखे प्रकार नियंत्रणात आनले पाहिजे. ते कमी करण्यावर संबंधीत यंत्रणांनी जागरुकता निर्माण करावी. त्या अनुषंगाने युवा सेनेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मुलींना ज्युडो- कराटे प्रशिक्षण बरोबरच स्वयंपूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. प्रत्येक बाबतीत मुलींना दोष देणे बरोबर नाही. त्यामुळे मुलांनीही मुलींशी कसे वागावे याचे संस्कार देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. 

संबंधित लेख