We will overcome blatant use police force & win farmer's battle : Raju shetty | Sarkarnama

कितीही पोलीस बळाचा वापर केला ,तरी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी करणारच :राजू शेट्टी

विजय पाटील
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

सरकारने शेतकरी ,कारखानादार यांची एकत्र बैठक करून प्रश्न सोडवला पाहिजे.त्यामुळे सरकारने १० नोव्हेंबर पर्यंत सरकारने दराचा प्रश्न सोडवावा अन्यथा ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात कडकडीत बंद आणि चक्काजाम हा होणार,असा सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. 

सांगली : " ऊस दराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांना एफआरपी देण्याऐवजी पोलीस बंदोबसतात गाळप करण्यासाठी ऊस पुरवत आहे. हे बेकायदेशीर आहे .  कितीही पोलीसबळ व गुंडागर्दी केली तरी शेतकऱ्यांचा लढा आपण यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,''असा इशारा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  खासदार राजू शेट्टी यांनी दिला  आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते. 

सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन भडकला आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉली त्याचबरोबर कारखान्यांची नोंदणी कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पेटवून देण्यात आली आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील आंदोलन चिघळला आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकार टीका केली आहे.

' एक महिन्याआधी कोल्हापूर मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळाले पाहिजे आणि त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करू अशी घोषणा केली होती.मात्र अद्याप पर्यंत या सरकार कडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नाही.यामुळे शेतकरी आणि कारखानादार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन राजकारण करत आहे,"असा आरोप शेट्टी यांनी केली .

" वास्तविक ऊस तोडल्यानंतर १४ दिवसात एफ आर पी एक रकमी देणे कायदेशीर असताना आज साखर कारखाने सुरू होऊन एक महिना होत आला आहे.मात्र अद्यापि एकाही कारखानदाराने हा कायदा पाळला नाही असे असताना या कारखानदारांच्यावर सरकारने काय कारवाई केली ? हे स्पष्ट केले पाहिजे आणि मुळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत ,एवढीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे," असे  राजू शेट्टी म्हणाले . 

 

संबंधित लेख