We should never disclose our future plan : Ashok Chavan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

'मन की बात' जाहीर करायची नसते :  अशोक चव्हाण

सरकारनामा
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

काही पक्ष 10-12 अशा जागा मागत आहेत. प्रत्येकाला एवढ्या जागा दिल्यास कॉंग्रेसकडे काय उरेल? असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला. योग्य मागणी असेल तर चर्चा करून निर्णय घेता येईल, असे चव्हाण यांनी नमूद केले. 

औरंगाबाद :  " लोकसभेची निवडणूक लढवायची का विधानसभेची? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. 'मन की बात' जाहीर करायची नसते. पक्ष सांगेल तो निर्णय घ्यावा लागेल,"कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले. 

" हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे आपल्याला माहीत नाही. मात्र माझ्या शेजारचा मतदारसंघ असल्याने काळजी घेऊ. औरंगाबादेतून अनेक जण तयारी करत आहेत, मला नांदेडकरांनी नाकारलेले नाही, त्यामुळे औरंगाबादमध्ये येण्याचा प्रश्‍नच नाही," असेही श्री. चव्हाण म्हणाले . 

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. चव्हाण म्हणाले, " सध्या कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. त्यातून उमेदवारांची पडताळणी केली जात आहे. अद्याप कुठलेही उमेदवार ठरलेले नाहीत. "

शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकसारखेच आहेत. त्यामुळे एमआयएमसोबच चर्चा करण्याचा प्रश्‍नच नाही, असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. 

 

संबंधित लेख