we should feel proud of sonia and rahul gandhi : Pawar | Sarkarnama

सोनिया व राहुल गांधी यांचा अभिमान वाटायला हवा : शरद पवार

संभाजी थोरात
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पाटण : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी गरिबांच्या सेवेचे व्रत ज्या परिस्थितीत सुरू ठेवले आहे, त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. मात्र या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका घराण्याने देशाचे वाटोळे केले, अशी विनाकारण टीका करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की मोदी यांना गांधी घराण्याशिवाय काही दिसत नाही. जाहीर सभेत ते एकच बोलतात ते म्हणजे एका घराण्याने देशाचे वाटोळे केले. पण वस्तुस्थिती काय आहे? जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या उमेदीचा काळ ब्रिटीशांच्या तुरुंगात घालवला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यांनी संसदीय लोकशाही बळकट केली. त्यांनी देशाचे नुकसान केले का, असा सवाल त्यांनी केला.

इंदिरा गांधींनी गरिब माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी सत्तेचा वापर केला. त्यांची हत्या झाली. त्यांच्यानंतरच्या काळात राजीव गांधी यांनी संपूर्ण देशाला आधुनिकतेचा विचार आणला. दुनियेमध्ये भारताची प्रतिष्टा वाढविण्याचे काम त्यांनी केले. त्यांचीही हत्या झाली. एवढा त्याग एखाद्या कुटुंबाने केला. या दोन हत्या झाल्यानंतर देशाच्या गरिबांच्या सेवेचे व्रत ज्या पद्धतीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सुरू ठेवले आहे. त्याचा अभिमान वाटला पाहिजे, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. मात्र मोदी यांना हे दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 
 
संबंधित लेख