संजय मंडलिक यांच्यासाठी विरोधकांचे नामोनिशाण आम्ही दोघांनी मिटविले....

संजय मंडलिक यांच्यासाठी विरोधकांचे नामोनिशाण आम्ही दोघांनी मिटविले....

कोल्हापूर : रुग्णालये, पंचतारांकित हॉटेलसाठी जागा बळकावणाऱ्या घराण्यातील कुणीही उमेदवार विधानसभेला आला तरी गोरगरीब जनता राजेश क्षीरसागर यांनाच पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्‍वास माजी महापौर रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केला. लोकसभेला खासदार प्रा, संजय मंडलिक यांच्यासाठी विरोधी पक्षाचे नामोनिशाण आम्ही दोघांनी मिटवल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
उत्तरचे शहरप्रमूख रविकिरण इंगवले यांच्या शहर शिवसेनेच्या कार्यालयाच्या आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे शहरप्रमूख आले किती गेले किती मात्र नावलौकिक मिळविलेले शिवसैनिक फार कमी झाले. अशा शब्दांत राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पक्षातंर्गत मतभेदावर या कार्यक्रमात पुन्हा एकदा बोट ठेवले.
 
श्री. क्षीरसागर म्हणाले,"शिवसेनेने मराठी माणसासाठी काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज शिवसेनेच्या रूपाने वटवृक्ष झाला आहे. 1986 ला कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना झाली. सहा आमदार जिल्ह्याने शिवसेनेने दिले. शहरप्रमूख म्हणून का कसे करायचे असते हे मी दाखवून दिले. नंतर पदासाठी रविकिरण इंगवले यांची निवड केली. पूर्वी अनेक शहरप्रमूख आले आणि गेले मात्र नावलोकिक मिळविणाऱ्यांची संख्या कमी होती.'
 
श्री. इंगवले म्हणाले, "विधानसभा निवडणुकीचे बिगूल आता वाजले आहे. गेल्या वीस वर्षात अनेक राजकीय नेत्यांशी माझा संपर्क आला पण जनतेला वेळ देऊन गोरगरीबांची कामे करणारा असा आमदार मी पाहिली नाही. निवडणूक असल्याने मोठ्या घराण्यातील व्यक्ती लोकांशी हितगुज करून संपर्क साधत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार शिवसैनिकांच्या रक्तात भिनले आहे. विकासाची दृष्टी असलेले श्रीरसागर यांची हॅट्रिक झाल्याशिवाय राहणार नाही.' 

महापौर माधवी गवंडी, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, प्रज्ञा उत्तुरे, दिगंबर इंगवले सुहास लटोरे,,ऍड. रमेश पोवार, प्रा.प्रभाकर हेरवाडे, डॉ. जगताप, व्ही. आर. पाटील आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com