भंडारा-गाेंदिया निवडणुकीत धनशक्तीच्या विराेधात जनशक्तीची लढत : अशाेक साेनाेने

''भंडारा-गाेंदिया लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात खुल्या मतदारसंघात एका सर्वसामान्य अादिवासी समाजबांधवाला उमेदवारी देऊन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश अांबेडकर यांनी अादिवासी समाजाचा सन्‍मान केला अाहे. या मतदारसंघात धनशक्तीच्या विराेधात भारिप-बहुजन महासंघ जनशक्तीची लढाई लढत आहे," असे भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशाेक साेनाेने यांनी ‘सरकारनामा’ शी बाेलताना सांगितले.
भंडारा-गाेंदिया निवडणुकीत धनशक्तीच्या विराेधात जनशक्तीची लढत : अशाेक साेनाेने

अकाेला : ''भंडारा-गाेंदिया लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात खुल्या मतदारसंघात एका सर्वसामान्य अादिवासी समाजबांधवाला उमेदवारी देऊन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश अांबेडकर यांनी अादिवासी समाजाचा सन्‍मान केला अाहे. या मतदारसंघात धनशक्तीच्या विराेधात भारिप-बहुजन महासंघ जनशक्तीची लढाई लढत आहे," असे भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशाेक साेनाेने यांनी ‘सरकारनामा’ शी बाेलताना सांगितले. 

भंडारा-गाेंदिया लाेकसभा मतदारसंघाची रणधुमाळी जाेरात सुरू झाली अाहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अाघाडी अाणि सत्ताधारी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकत भारिप बहुजन महासंघाने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली अाहे. या निवडणुकीच्या माेर्चेबांधणीसाठी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश अांबेडकर यांनी गेल्या अाठ दिवसांपासून मतदारसंघात तळ ठाेकला असून भारिपची राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे अशाेक साेनाेने यांनी सांगितले. 

''ही निवडणुक भारिपसाठी प्रतिष्ठेची अाहे. कारण 1954 मध्ये याच मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांना कटकारस्थान करून पराभूत करण्यात अाले हाेते. बाबासाहेबांच्या पराभवाचे शल्य अाजही अांबेडकरी जनतेच्या मनात कायम अाहे. त्यामुळे या पाेटनिवडणुकीच्या निमित्याने बाबासाहेबांच्या पराभवाची जखम भरून काढण्यासाठी राज्यातील अांबेडकरी जनता एकवटली अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अाघाडी अाणि भाजप या निवडणुकीत धनशक्तीचा वापर माेठ्या प्रमाणात करीत अाहे. 
मात्र, त्यांच्या धनशक्ती विराेधात अाम्ही जनशक्तीची लढाई लढत आहोत," असे अशाेक साेनाेने म्हणाले. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात मागासवर्गीय, अादिवासी, बहुजन, अल्पसंख्यांकावर अनेक अत्याचार केले. अाता सत्ताधारी भाजपच्या काळातही या समाजबांधवांवर अत्याचार वाढले असून त्याविरुद्ध अामची लढाई सुरू असल्याचे अशाेक साेनाेने यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com