Water Issue will be serious in Bhujbal's Constituency | Sarkarnama

भुजबळांच्या मतदारसंघात पाण्यावरुन पेटणार संघर्ष 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तर नांदगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांचे पुत्र पंकज भुजबळ करतात. पाऊस नसल्याने दोन्ही तालुक्‍यांत अडचणीची स्थिती आहे. मात्र, पाऊस नसल्याने समस्या गंभीर आहे. येवल्यातील अंदरसुल परिसरात पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला. परंतु, सतत आवर्षणग्रस्त परिसर असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा येवला आणि पंकज भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या नांदगाव मतदारसंघात पाण्या टिपूसही नाही. प्रशासन उदार होऊन येवला आणि मनमाड शहराला पाणी देण्यास तयार झाले. मात्र, शहरालाच नव्हे तर अन्य भागालाही पाणी द्या या मागणीवरुन कार्यकर्ते भिडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पाण्यावरुन संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. 

येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तर नांदगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांचे पुत्र पंकज भुजबळ करतात. पाऊस नसल्याने दोन्ही तालुक्‍यांत अडचणीची स्थिती आहे. मात्र, पाऊस नसल्याने समस्या गंभीर आहे. येवल्यातील अंदरसुल परिसरात पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पिण्याला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या भागातील वितरीका 45 ते 52 च्या लाभक्षेत्रात येणारे बंधारे पालखेड कालव्याच्या आवर्तनातुन भरुन देण्याची माणगी होत आहे. मात्र, पाऊस नसून, धरणात पुरेसे पाणी नसल्याने येवला व मनमाड वगळता कुणालाही पाणी न देण्याची भूमिका जिल्हाधिकार्यांनी घेतली आहे. 

पालखेड डाव्या कालव्यातून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी टंचाईग्रस्त भागातही पिण्यासाठी मिळावे अशी मागणी बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे व अंदरसुच्या सरपंच विनीता सोनवणे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली. यावेळी पाणी सोडण्याबाबत लेखी निवेदन देऊन चर्चा केली. संपूर्ण येवला तालुक्‍यात अत्यल्प पर्जन्यानामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी सोडण्याची गरज असल्याचे तहसीलदारांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पाऊस न पडल्यास पुढे काय करणार? असा सवाल करून पाणी देण्यास जिल्हाधिकार्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या स्थितीमुळे विरोधकही जागे झाल्याने पाण्यासाठी नवा राजकीय वाद उफाळण्याची शक्‍यता आहे. 

पाण्याअभावी शेतीची अवस्था बिकट झाली आहे. मात्र, जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्ठा होऊ नये यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठा पाहता पिण्याच्या पाण्याची गरज भागवणारे बंधारे भरून द्यायला हवेत. 
- मकरंद सोनवणे, संचालक, बाजार समिती, येवला 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख