washim-maratha-reservation-youth-attemmpted-suicide | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी वाशीममधील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी (ता.३०) वाशीम तालुक्‍यातील मोहगव्हाण येथील पवन माणिक डुबे (वय १८) या युवकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खिशात मराठा आरक्षण असे लिहीलेली चिठ्ठी सापडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

वाशीम : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी (ता.३०) वाशीम तालुक्‍यातील मोहगव्हाण येथील पवन माणिक डुबे (वय १८) या युवकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खिशात मराठा आरक्षण असे लिहीलेली चिठ्ठी सापडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
 
मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा संपूर्ण राज्यात पेटला आहे. ठिकठिकाणी आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत. वाशिम जिल्ह्यातही असा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

मोहगव्हाण येथे पवन माणिक डुबे या युवकाने आरक्षणासाठी सोमवारी विष प्राशन केले. आठवडाभरापासून तो टीव्हीवर आरक्षण आंदोलनाच्या बातम्या पाहत होता. अशातच नैराश्यामुळे आरक्षणाबाबत घोषणा देऊन त्याने विषारी रसायनाचा डब्बा तोंडाला लावल्याची माहिती आहे. 

कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. 

खिशात सापडली चिठ्ठी
मराठा आरक्षणाच्या बाबतचे वृत्त पाहण्यासाठी पवन दिवसभर दूरचित्रवाणीसमोरच बसून राहात असे, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्‍टरांनी तसेच कुटुंबियांनी त्याच्या कपड्याची तपासणी केली असता, खिशात मराठा आरक्षण अशी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.

संबंधित लेख