वाशीम : राजू पाटील, विजय जाधवांना भाजप संधी देणार?

शतप्रतिशत भाजप असा नारा देत गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्ष कार्याला कार्यकर्त्यांनी उभारी दिली. मात्र आता युती धर्माची उजळणी पुन्हा होणार असल्याने अनेक निष्ठावंतांच्या आशेला पाणी फेरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. इमाने- इतबारे पक्ष वाड्यावस्त्यावर पोचविणार्‍या ‘कॅटडबेस’ कार्यकर्त्यांना आता विधानपरिषद हा एकमेव पर्याय उरला असल्याने युतीधर्मात वंचित ठरलेल्या या शिलेदारांचे लक्ष आता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे.
वाशीम : राजू पाटील, विजय जाधवांना भाजप संधी देणार?

वाशीम : शतप्रतिशत भाजप असा नारा देत गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्ष कार्याला कार्यकर्त्यांनी उभारी दिली. मात्र आता युती धर्माची उजळणी पुन्हा होणार असल्याने अनेक निष्ठावंतांच्या आशेला पाणी फेरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. इमाने- इतबारे पक्ष वाड्यावस्त्यावर पोचविणार्‍या ‘कॅटडबेस’ कार्यकर्त्यांना आता विधानपरिषद हा एकमेव पर्याय उरला असल्याने युतीधर्मात वंचित ठरलेल्या या शिलेदारांचे लक्ष आता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर प्रारंभी भाजप -शिवसेनेचा सवतीमत्सर आपल्या पथ्यावर पडेल. या मनोराज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मश्गूल राहिले. मात्र उमेदवार जरी शिवसेनेचा असला तरी केंद्रात नरेंद्र मोदीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून विजय खेचून आणला. 

वाशीम जिल्ह्यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला 51 हजाराचे मताधिक्य मिळाले. आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत हे मताधिक्य सर्वाधिक आहे. 

माजी आमदार विजय जाधव यांनी निवडणूक काळात वाड्यावस्त्या पालथ्या घालून पक्षाला मताधिक्य मिळवून दिले. 

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शहरी भागात भारतीय जनता पक्षाने चांगलेच बाळसे धरले असताना ग्रामीण भागात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा होता. मात्र पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍या राजू पाटील राजे यांनी भारतीय जनता पक्षाला ग्रामीण भागात आधार मिळवून दिला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रचंड संघटन शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर कायम हालत ठेवले होते. राजू पाटील यांच्यासोबत संपूर्ण संघटनाच भाजपवासी झाली. त्यामुळे भाजप वाडीवस्त्यावरही पोचला. जिल्ह्याबरोबरच अकोला, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात ग्रामीण भागातही संघटनेला पोचविले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सहा जिल्ह्यामध्ये तनमनधन खर्च करून संघटनेला उभारी देण्याचे काम केले. 

पक्षाकडे मात्र यांच्यासाठी मतदारसंघच शिल्लक नाही. शिवसेनेसोबत युती असल्याने युती धर्मात वाशीम व रिसोड हे भाजपच्या कोट्यात तर कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीवर आहे. यामध्ये बदल होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने राजू पाटील राजे यांच्यासाठी विधान परिषद हा एकमेव पर्याय आहे. ग्रामीण भागामध्ये प्रचंड जनसंपर्क असल्याने तसेच शहरी भागातही भाजपच्या कोणत्याही गटातटाच्या वळचणीला नसल्याने आता ग्रामीण भागातूनही पक्ष कार्यकर्त्यांमधून विचारणा होत असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com