warkari nadolan in mumbai | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मंदिर समिती : आक्रमक वारकऱ्यांचे 10 ऑक्‍टोंबरला मुंबईत आंदोलन! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नियोजनासाठी शनिवारी आळंदीत बैठक 
विठ्ठल रूक्‍मिणी मंजूरी समितीमध्ये वारकारी प्रतिनिधी घ्यावेत या मागणीसाठी असलेल्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होणे व त्याचे नियोजन करण्यासाठी वारकरी सांप्रदायिकांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी (ता. 16) दुपारी चार वाजता अमृतनाथ स्वामी मठ, आळंदी देवाची येथे आयोजित केली आहे. 
 

सातारा : शासनाने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीवर दोन सदस्य वगळता वारकरी संप्रदायाचा लवलेशही नसलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे समस्त वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यामुळे ही मंदिर समिती बरखास्त करून वारकऱ्यांची नवी समिती नेमावी, या मागणीसाठी येत्या दहा ऑक्‍टोबरला वारकरी आझाद मैदानावर भजनी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी दिली. 

सध्या श्री विठ्ठल मंदीर समिती विरूध्दचे वारकऱ्यांचे आंदोलन गाजत आहे. समितीचे अध्यक्ष व अन्य बिगर वारकरी सदस्य नेमल्यामुळे शासनाच्या विरोधात वारकऱ्यांत तीव्र संताप आहे. यासंदर्भात बंडातात्या कराडकर म्हणाले, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती बारा सदस्यांची असून तीन जुलैला शासनाने नऊ सदस्यांची घाईघाईत नेमणूक केली आहे. यामध्ये वारकऱ्यांचे केवळ दोन प्रतिनिधी तर सात प्रतिनिधी वारकऱ्यांचे आहेत. मुळात ते वारकरी नाहीत. त्यांना वारकरी संप्रदयाचे ज्ञान नाही. त्यांचे आचारविचार भिन्न आहेत. त्यामुळे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराबरोबरच वारकरी संप्रदायाचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे. सरकारने नेमलेली नवी समिती म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या भावनेशी खेळ आहे. त्यामुळे वारकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याची जाण असलेलेच सदस्य समितीवर असणे आवश्‍यक आहे, असे मत कराडकर यांनी व्यक्त केले. आमचा मंदिर समितीला किंवा कोणत्याही सदस्याला विरोध नाही, तर केवळ मंदिराचे आणि वारकरी संप्रदायाचे पावित्र्य जपण्याकरिताच समितीवर वारकऱ्यांची नेमणूक करावी, अशी भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स

संबंधित लेख