war of words in bhor BJP | Sarkarnama

भोरच्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कलगीतुरा; एकमेकांवर चिखलफेक 

विजय जाधव
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

भोर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीच्या चिंतन बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोपांची चिखलफेक केली. पालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी पराभवाचे खापर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांवर फोडले.

काहींनी आर्थिक बाबींचा हिशेब मागितला, काहींनी शहाणपणा न शिकविण्याची भाषा केली, तर काहींनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. त्यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता. 31) येथील अभिजित भवन मंगलकार्यालयात भाजपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस भाजपचे संघटन सरचिटणीस सचिन सदावर्ते व बारामती मतदारसंघाचे  विस्तारक शिवाजी भुजबळ, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड यांच्यासह तालुकाध्यक्ष गणेश निगडे, सचिन मांडके, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दीपाली शेटे उपस्थित होत्या.

बैठकीची सुरवात अगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चेने झाली. परंतु दीपाली शेटे व इतरांनी पालिकेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमुळे मला पराभव पत्करावा लागल्याचे सांगून त्यावर प्रथम चर्चा व्हावी अशी मागणी केली. त्यामुळे वातावरण तापले गेले. काहींनी तर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपच्या तालुक्‍यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. चर्चेत एकमेकांवरील आरोप वाढत गेले आणि दीपाली शेटे यांनी कार्यकर्त्यांसमवेत सभात्याग केला.

अखेर काही मोजके पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे सर्वांनी आत्मपरीक्षण करावे आणि खचून न जाता पक्षवाढीबरोबर पुढील लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन उपस्थित प्रमुख नेत्यांनी केले. आम्ही पराभव स्वीकारून पुढील निवडणुकीसाठी योग्य ती कार्यवाही व पक्षबांधणी करणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश निगडे यांनी सांगितले. 

संबंधित लेख