तेजस्वी सातपुते :व्हायचे होते पायलट, झाल्या एसपी 

तेजस्वी सातपुते या मुळच्या शेवगाव येथील आहेत. त्या 2012 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून आयपीएस परिक्षेत त्यांचा 198 वा रॅंक होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची परतूर येथे त्यांची नियुक्ती झाली होती.
Tejasvee Satpute
Tejasvee Satpute

सातारा : चष्मा लागल्याने पायलट होता येत नाही, असे सांगण्यात आल्याने त्यांचा लहानपणी स्वप्नभंग झाला. पण जिद्द न सोडता एलएलबी करताना युपीएससीच्या परिक्षेच्या माध्यमातून आयएएस व आयपीएस होता येते हे त्यांना समजले. त्यामुळे पायलट होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून नवीन दिशा दिसली. त्यामुळे त्यांनी एलएलबी दुसऱ्यावर्षातच सोडून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्या प्रयत्नात तेजस्वी सातपुते या आयपीएस झाल्या. 

निर्मलजित सिंग वायू सेनेत पायलट होते. भारत-पाक युध्दात त्यांच्या विमानाला अपघात झाला होता. तरीही त्यांनी पॅराशुटच्या मदतीने बाहेर पडण्याऐवजी शत्रुची चार विमाने पाडुन ते शहिद झाले. ही प्रत्यक्ष घटना त्यांच्या लहानपणी कानावर आली होती. त्यामुळे त्यांनी चौथीत शिकत असताना पायलट होण्याचे मनात ठरविले होते. पण त्यांना लवकरच चष्मा लागला. त्यावेळी चष्मा लागल्यावर पायलट होता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा स्वप्नभंग झाला.

  बारावी पूर्ण केल्यानंतर बायोटेक्‍नॉलॉजीतून बीएसस्सी करताना बंगलोरच्या मोठ्या संस्थेत प्रोजेक्‍ट ओरिएंटेड बायोलॉजिकल प्रकल्पासाठी त्यांची निवड झाली. सलग तीन  वर्षे सुट्टीत हा प्रकल्प पूर्ण करायचा होता. संपूर्ण भारतातून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश होते. पण त्यांना हे करायचे नव्हते त्यामुळे त्यांनी हे सोडून दिले. 
त्या परत आल्या. तोपर्यंत सर्व ऍडमिशन संपले होते. त्यावेळी केवळ एलएलबीचा प्रवेश शिल्लक होता. त्यामुळे त्यांनी आयएलएस लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. 

शिकत असताना दुसऱ्या वर्षी काही मुले सातत्याने वृत्तपत्र वाचत बसलेली दिसायची. त्यामुळे त्यांना याबाबत विचारले. आम्ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतोय, असे सांगितले. या परिक्षा दिल्यानंतर एसपी आणि कलेक्‍टर होता येते असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पायलट होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांना प्रथमच यामाध्यमातून नवीन दिशा दिसली.

त्यानुसार त्यांनी स्पर्धा परिक्षा देण्याचे ठरविले. एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांनी स्पर्धा परिक्षा दिली. त्यात त्या अत्यंत कमी मार्काने नापास झाल्या. त्यावेळी त्यांना विश्‍वास आला की अभ्यास करून आपण चांगले मार्क मिळवू शकतो. पूर्णवेळ अभ्यास केला तर नक्की यशस्वी होऊ. त्यामुळे एलएलबी सोडून त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. दुसऱ्याच प्रयत्नात त्या युपीएससीची परिक्षा पास झाल्या. 

तेजस्वी सातपुते या मुळच्या शेवगाव येथील आहेत. त्या 2012 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून आयपीएस परिक्षेत त्यांचा 198 वा रॅंक होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची परतूर येथे त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात टेक्‍निकल सर्व्हीसेस प्रशिक्षणाच्या अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी पुणे ग्रामिणमध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून काम केले आहे.

पाचच महिन्यापूर्वी त्यांची तेथून पुणे आयुक्तालयात वाहतूक उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. काल (रविवारी) त्यांची तेथून साताऱ्याचे अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली. मीरा बोरवणकर यांनी तीन जुलै 1996 रोजी सातारच्या पोलिस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारला होता. 31 मार्च 1999 पर्यंत त्यांनी कार्यभार पाहिला. त्यांच्यानंतर तब्बल 22 वर्षांनी सातारा जिल्ह्याला महिला पोलिस अधिक्षक मिळाल्या आहेत. त्या उद्या (मंगळवार) साताऱ्यात पदभार स्विकारणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com