want leave country? who stops you? : abhyankr | Sarkarnama

देश सोडायचाय? कोणी अडवलंय तुम्हाला? : विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर

अमोल कविटकर
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे : ''भारतात एका छत्राखाली अनेक जण आनंदाने नांदताहेत. पण काही जणांना अकारण चिंता वाटायला लागते. कुठल्या नटाच्या पत्नीला वाटायला लागते माझे जीवन इथे सुरक्षित नाही. राष्ट्र सोडून जाऊया. जा ना मग. कोणी अडवले तुम्हाला? कुठल्या नटाला वाटायला लागते माझ्या मुलांचे जीवन इथे सुरक्षित नाहीय. नाही वाटत ना? मग राष्ट्र सोडून जा ना" अशा शब्दांत विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी अभिनेता अमीर खान आणि नसरुद्दीन शहा यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

कोथरूडमधील नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त यंदापासून सुरु केलेला पहिला 'अटल जीवन गौरव' पुरस्कार डॉ. अभ्यंकर यांना मूर्ती शास्त्राचे अभ्यासक  गो.ब. देगलूरकर आणि पालकमंत्री बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ज्यांना देश सोडवासा वाटतोय त्यांना कोणी अडवले आहे? असा प्रश्न उपस्थित करत डॉ. अभ्यंकर म्हणाले, "ज्यांना या देशात भीतीचे आणि द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे वाटत असेल तर त्यांनी एकदा इतिहास काढून वाचावा. त्यावरून देशावर आजवर कोणी आक्रमणे केली हे त्यांच्या लक्षात येईल".

"भारताचे तीन राष्ट्रपती मुस्लिम होते. देशाचे गृहमंत्रीही मुस्लिम झाले. क्रिकेट संघाचे कर्णधार मुस्लिम होते. आमच्या राज्याचे राज्यपाल ख्रिश्चन होऊ शकतात. या सारखी समांतर बाब जगात इतर कुठेही नाही, त्यामुळे भारत सर्वसमावेशक देश आहे", असेही डॉ. अभ्यंकर म्हणाले.

संबंधित लेख