वंचित आघाडीतर्फे सांगली लोकसभेसाठी जयसिंग शेंडगे

.
वंचित आघाडीतर्फे सांगली लोकसभेसाठी जयसिंग शेंडगे

सांगली:  वंचित विकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून रिपब्लिकन पक्षाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात थेट उडी घेतली आहे. 

अर्थात त्यांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर सुरू असलेल्या चर्चेसाठीच्या दबावतंत्राचा भाग म्हणून या घोषणेकडे पाहिले जात आहे.

वसंतदादा पाटील यांचे मुंबईतील निकटचे कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात तसा उशिराच प्रवेश झाला. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या श्री. शेंडगे यांच्या रूपाने धनगर समाजाला राज्यस्तरीय ओळख मिळाली. 

त्यांचे कनिष्ठ बंधू जयसिंगराव शेंडगे यांचा राजकीय प्रवास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता वंचित बहुजन विकास आघाडी असा आहे. 2004 मध्ये त्यांनी कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणूनही लढत दिली होती. सध्या ते सेनेत सक्रिय नाहीत; मात्र धनगर आरक्षणाच्या निमित्ताने ते राज्यभर सक्रिय आहेत. 

जिल्ह्याच्या जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, मिरज पूर्व भागात धनगर समाजाचा मोठा जनाधार आहे.वंचित विकास आघाडीच्या सांगलीतील जाहीर सभेच्या नियोजनातही शेंडगे यांचा सहभाग होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com