चालणे व समतोल आहार हेच फिटनेसचे रहस्य : नितीन राऊत

दररोज किमान 7-8 किलोमीटर चालणे व समतोल आहार हेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे.... माजी मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे प्रमुख डॉ. नितीन राऊत 'सरकारनामा'ला सांगत होते.
चालणे व समतोल आहार हेच फिटनेसचे रहस्य : नितीन राऊत

नागपूर : दररोज किमान 7-8 किलोमीटर चालणे व समतोल आहार हेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे.... माजी मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे प्रमुख डॉ. नितीन राऊत 'सरकारनामा'ला सांगत होते.

काही वर्षांपूर्वी माझे वजन वाढलेले होते. पोटही सुटलेले होते. जवळपास 100 किलो एवढे वजन झाले होते. त्यामुळे हालचाल करणे किंवा एका ठिकाणी बराच वेळ बसून काम करणेही अवघड होत होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने वाढलेले वजन अडचणीचे ठरत होते. जेवणाऱ्या वेळाही ठरलेल्या नसल्याने वजन वाढण्यास कारणीभूत ठरले. काहींनी यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु, शस्त्रक्रिया करण्यापेक्षा व्यायाम व आहारावर नियंत्रण आणल्यास काही परिणाम होऊ शकते, असाही पर्याय डॉक्‍टरांनी सुचविला होता. व्यायाम व नियंत्रित आहाराचा पर्याय स्विकारला. त्यादृष्टीने व्यायामाला सुरूवात केली.

घराजवळ फिरायचे म्हटले तर ओळखीचे अनेकजण भेटत असल्याने चालण्यापेक्षा भेटीगाठीच जास्त होत. त्यामुळे नागपूर शहरातील काहीसा मोकळा भाग व केंद्र सरकारचे अधिक कार्यालये असलेल्या सेमिनरी हिल्स परिसराची चालण्यासाठी निवड केली. सेमिनरी हिल्स परिसरात एका ठिकाणी गाडी लावायची आणि जवळपास 7 ते 8 किलोमीटर फिरणे सुरू केले. या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असते. झाडांची संख्याही जास्त असल्याने शुद्ध हवा व ऑक्‍सीजनही चांगला मिळतो. अनेकजण या भागात फिरायला येत असल्याने व्यायामाचे एक वातावरण आपोआप तयार होते.

आहार नियमित ठरलेला आहे. सकाळी ब्लॅक टी घेतो. दुधाचा चहा कधीही घेत नाही. सकाळी वर्तमानपत्रांचे वाचन केल्यानंतर लाईट नास्ता घेतो. यात तेलकट, तुपकट पूर्णपणे टाळतो. दुपारी 2 वाजता जेवण घेतो. जेवणात 2 चपाती व थोडा भात एवढाच आहार घेतो. जेवणात सलाड आवर्जुन घेतो. सलाडमुळे चयापचयाची क्रिया चांगली होते. यानंतर एकदम रात्रीच दोन चपात्या खातो. रात्रीच्या जेवणात भात घेत नाही. मद्य पूणपणे वर्ज्य आहे. हा दिनक्रम गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. यामुळेच अजूनही माझे वजन नियंत्रणात आहे. दररोज चालणे व नियंत्रित आहार हेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com