wakale and nagar | Sarkarnama

नगरच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नगर : महापालिकेतील आज झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर व उपमहापौर निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी या चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारली ! उपमहापौरपदी भाजपच्याच मालन ढोणे यांना संधी मिळाली. राष्ट्रवादीतर्फे गटनेता संपत बारस्कर यांनी तर शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. तर उपमहापौरपदासाठी सेनेकडून गणेश कवडे तर कॉंग्रेसकडून रूपाली वारे यांचा अर्ज होता. वारे यांनी आज अर्ज मागे घेतला. 

सभागृहात गेल्यावर कॉंग्रेसने जातीयवादी पक्षासोबत न जाण्याचा निर्णय घेऊन बहिष्कार घातला. छिंदमने शिवसेनेला मतदान केले म्हणून त्याला मारहाण झाली आणि प्रक्रियेवर बहिष्कार घातला. एका खासदार आणि आमदाराने सांगितल्याने छिंदमने ही चाल केल्याचा आरोप शिवसेनेने केला. शिवसेना गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी छिंदमचे मत ग्राह्य धरले जाऊ नये असे पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने ते ग्राह्य धरले नाही. 

संबंधित लेख