Wahegavsaal people threaten of mass sueside | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

वाहेगावसाळला सामूहिक आत्महत्येचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्र्नांबाबात अजिबात गंभीर नाही. आज शेतकरी आत्महत्या होत आहेत अन् सरकार भविष्याच्या बाता मारते आहे.

``- अरुण न्याहारकर, माजी सरपंच, वाहेगावसाळ.

नाशिक:  कर्जमाफी करा अन्यथा सामूहीक आत्महत्या करु असा इशारा देणारा ठराव वाहेगावसाळ (ता. चांदवड) येथे आज झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.  यासंदर्भात 1 जून पासून संपावर जाण्याचाही इशारा देण्यात आल्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या चांदवड तालुक्‍यात या प्रश्र्नावरुन संघर्षाची ठिणगी पडली आहे. 

यावेळी प्रतीकात्मक फासासाठी शेतकरी दोरखंड घेऊन ग्रामसभेसाठी उपस्थित होते. हा ठराव गुरुवारी तहसीलदारांना देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. मातीत सोने पिकविणाऱ्या बळीराजावर उपासमारीची वेळ आल्याने बेमुदत संपाचे हत्यार उपसण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नसल्याचे ग्रामसभेने ठणकावून सांगितले.

 अरुण न्याहारकर, सरपंच शोभा न्याहारकर, निवृत्ती न्याहारकर, उपसरपंच महेश न्याहारकर, योगेश रायते, प्रकाश चव्हाण, केशव खैरे, राजाराम मंडलिक, कैलास गांगुर्डे, चिंधू आहेर, नंदू मंडलिक, रतन गांगुर्डे यांनी कर्जमाफीविषयक भूमिका मांडली. शेतीत यंदा प्रत्येकाला तोटा सहन करावा लागला असून, कर्जाचा डोंगर वाढला असताना समोर आशादायक चित्र दिसत नाही. त्यामुळे शेतकरी मृत्युला कवटाळत आहेत. आता तरी सरकारला जाग येईल काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 

भाव वाढताच सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली जाते. मग आता आम्ही कोणाकडे वेतनवाढ मागायची, असा प्रश्‍न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी संपाच्या काळात गरजेपुरते पिकविणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष ग्रामसभेसाठी महिलांची उपस्थिती मोठी होती. 

संबंधित लेख