बीडमध्ये फक्त एक फरार नगरसेवक मतदानापासून वंचीत

बीडमध्ये फक्त एक फरार नगरसेवक मतदानापासून वंचीत

बीड : लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी बीड जिल्ह्यातील माजलगावचा राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक वगळता 1005 पैकी 1004 मतदान झाले. फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या विजय उर्फ भारत अलझेंडेला मतदान करता आले नाही. भाजपचे सुरेश धस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केलेले अशोक जगदाळे यांचा फैसला आता गुरुवारी (ता. 24 ) होणार आहे. 

लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री सुरेश धस तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केले होते. सुरुवातीपासून निवडणुक रंगतदार आणि शेवटच्या टप्प्यात रंजक झाली. सोमवारी सकाळी आठ वाजता सुरु झालेली मतदान प्रक्रीया चार वाजता संपली. तीन जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर ही प्रक्रीया पार पडली. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 353 पैकी 353, उस्मानाबाद जिल्ह्यात 291 पैकी 291 तर बीड जिल्ह्यात 361 पैकी 360 मतदानाची नोंद झाली. एकूण 1005 पैकी 1004 मतदान झाले. शंभर टक्के मतदान होण्यास माजलगावच्या राष्ट्रवादीच्या फरार नगरसेवकाचा अडथळा ठरला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com