voters voted for development in sangli jalgaon : Ravsaheb Danve | Sarkarnama

जळगाव, सांगलीमध्ये जनतेने विकासाला दिला कौल : रावसाहेब दानवे 

भास्कर बलखंडे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव व सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेले  यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे.

जालना: " जळगाव व सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेले  यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, "अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब  दानवे यांनी शुक्रवारी(ता.3) व्यक्त केली.

खासदार दानवे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांचे काम जनतेला पसंत पडले आहे. जनतेला विकास हवा आहे. मोदीजीं यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकास करत आहे. त्यामुळेच राज्यात सातत्याने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकात जनतेने भाजपाला पाठिंबा दिला आहे. जनता विकासाच्या मुद्द्यालाच पाठिंबा देते हे आजच्या निकालावरून दिसून येत आहे " . 

 

संबंधित लेख