खासदार गोडसे, आमदार घोलपांना मतदार म्हणाले 'मतदारसंघात फिरणे अवघड करु' 

येथील एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे 210 मेगावॉटचे तीन संच 2021 पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याची घोषणा 'महानिर्मिती' कंपनीने केली. यापूर्वी उर्जामंत्री बावनकुळे यांनी लोकसुनावणीत प्रकल्प बंद करु दिला जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात या प्रकल्पाची सतत कोंडी केली जात आहे.
खासदार गोडसे, आमदार घोलपांना मतदार म्हणाले 'मतदारसंघात फिरणे अवघड करु' 

नाशिक : उत्तर महाराष्ट्राचा प्रतिष्ठेच्या एकलहरे वीज प्रकल्पाची सरकार सतत कोंडी करीत आहे. आता तर हे केंद्र बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. सर्व लोकप्रतिनिधींना हा प्रकल्प वाचवावा, तसे न केल्यास 2019 च्या निवडणुकीत मतदारसंघात फिरणेही अवघड होईल. या शब्दात परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलप यांना खडसावले. आक्रमक नागरिकांचे खडे बोल ऐकुन खासदारांनी कसेबसे स्मित करुन आपली सुटका करुन घेतली. 

येथील एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे 210 मेगावॉटचे तीन संच 2021 पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याची घोषणा 'महानिर्मिती' कंपनीने केली. यापूर्वी उर्जामंत्री बावनकुळे यांनी लोकसुनावणीत प्रकल्प बंद करु दिला जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात या प्रकल्पाची सतत कोंडी केली जात आहे. अनेक कामे बंद झाली. रोजगार बुडाला. स्थानिक नागीरकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलप यांच्या मतदारसंघातील हा प्रकल्प आहे. 

भाजपचे आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी अनेकदा स्थानिकांना मंत्र्यांकडे नेले. मात्र झाले काहीच नाही. या पार्श्‍वभूमीवर नागरीकांची बैठक झाली. यावेळी संतप्त ग्रामस्थ, कार्यकर्ते, नागरीकांनी खासदार गोडसे, आमदार घोलप, आमदार सानप यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी कार्यकर्ते, नागरीकांनी राज्य शासनावर शरसंधान केले. नवीन मंजूर 660 मेगावॉट संच लवकर सुरू होण्याबाबत किंवा शासनाने 250 मेगावॉटचे दोन किंवा तीन संच द्यावेत, यावर प्रकल्प बचाव समितीच्या बैठकीत मागणी झाली. हा प्रकल्प वाचला नाही तर येत्या 2019 च्या निवडणुकीत खासदार, आमदारांना प्रचारासाठी फिरु देणार नाही. हे लक्षात ठेवा अशा इशारा देण्यात आला. यावर खासदारांनी स्मित करीत सुटका करुन घेतली तर आमदार घोलप यांना मात्र घाम फुटला. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे, नगरसेवक विशाल संगमनेरे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर, पंचायत समिती सदस्य विजय जगताप, सचिन जगताप, प्रकाश घुगे, सरपंच बाळासाहेब म्हस्के, राजाराम धनवटे, सागर जाधव, तानाजी गायधनी, रामदास सदाफुले आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com