vivek pandit | Sarkarnama

श्रमजीवींचे पालघरात ठिय्या आंदोलन सुरूच

सुचिता रहाटे: सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या सीईओ निधी चौधरी यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तन आणि जिल्हापरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण चांगलेच चिघळले असून निधी चौधरी यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. तसेच त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असे पोलिस उपअधीक्षक गोयल यांनी स्पष्ट केले. तरीही पंडित यांना जामीन मिळाला नाही त्यानिषेधार्थ श्रमजीवी संघटनेने ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे. श्रमजीवींच्या या आंदोलनाला समविचारी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. 

लोकशाहीतील स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसाठी आणि गरिबांच्या न्याय्यासाठी सनदशीर मार्गाने लढाई करत जेलमधे गेलेल्या श्रमजीवी कार्यकर्त्यांना आमचा पाठिंबा आहे असे, जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. शोषित जन आंदोलन, मानवी हक्क अभियान, वसई जनआंदोलन आदी बंधू जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन श्रमजीवी कार्यकर्त्यांना पाठिंबा असल्याचे प्रसिद्धी पत्रक दिले. 

संबंधित लेख