Vision 2030 documenet by State Planning Commission | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

राज्यात 10 लाख कोटी गुंतवणूकीचे ध्येय नियोजन विभागाचे व्हिजन 2030 डॉक्युमेंट तयार

महेश पांचाळ
बुधवार, 19 एप्रिल 2017

फडणवीस सरकारच्या अडीच वर्षं  काळात 2.62  लाख कोटी ची गुंतवणूक करण्यात यश मिळाले आहे.   देशाच्या अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर   राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र हा आघाडीवर राहील असे नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते.      

मुंबई- राज्यात मोठया प्रमाणात गुंतवणूक व्हावी साठी यापुर्वी महाराष्ट्र सरकारने अनेक सामजस्य करार (एमओयू ) केले असले तरी 42 करारापैकी 2.62 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करण्यात  सरकारला यश मिळाले आहे.  आता सन 2030 पर्यंत 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होईल असे ध्येय उद्धिष्ट  ठेवणारे व्हिजन 2030 डाॅक्युमेंट नियोजन विभागाने तयार केले आहे.   

केंद्रीय  नीति आयोगाने  सर्व राज्यांना  राज्यातील सर्व विभागाच्या माध्यमातून सर्वंकष विकास साधता यावा तसेच राज्याच्या आर्थिक प्रगती बाबतचे धोरण निश्चित करावे अशा सूचना दिल्या होत्या.  त्यानुसार राज्य सरकारच्या नियोजन विभागाने 20 विभागाचा  आढावा घेतला. कृषी पर्यटन , गृहनिर्माण , सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय,  आरोग्य, पाटबंधारे कौशल्य विकास शिक्षण, उद्योग  आदी विभागाची सद्यस्थिती आणि पुढील प्रत्येक विभागाचे ध्येय काय असेल याबाबत मनुष्यबळ आणि आर्थिक निधीची सांगड घालत नियोजन विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्या खात्याकडून ' व्हिजन 2030 डॉक्युमेंट ' तयार करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले.  राज्य सरकारने 1995 ते 2015 या 25 वर्षीच्या  काळात 11 लाख कोटी ची गुंतवणूक केली होती . फडणवीस सरकारच्या अडीच वर्षं  काळात 2.62  लाख कोटी ची गुंतवणूक करण्यात यश मिळाले आहे.   देशाच्या अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर   राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र हा आघाडीवर राहील असे नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते.      

राज्य सरकारने इको टूरिझम आणि बीच टूरिझम या विभागाकडे येत्या काळात लक्ष देण्याचे ठरवले असून 30 हजार कोटींची गुंतवणूक या विभागात केली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करताना राज्यात डॉक्टरांची संख्या वाढावी यासाठी वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत.

संबंधित लेख